हाच तो मालक आणि मालकिन यांना दवाखाना दाखवणारा..
#सत्य_घटना
मि आज माझ्या लोणी घाट येथील शेतात गेलतो आणि हा बैल वाटेच्याकडेला बांधलेला दिसला आणि मि त्याचा लगेच एक सेल्फी घेतला.
याचा सेल्फी घेताना माझ्या मनाला एखांद्या सेलिब्रिटींचा मि सेल्फी घेतोय असं फिल होत होतं.
हा बैल आहे म्हणून TRP पासुन दुर आहे अन्यथा या ठिकाणी माणुस असता तर याचे वृतमानपत्रात रखानेच्या रखाने भरून आलेले तर मिडिया वाल़्यांची झूंड लोणी घाट गावात दिसली असती.
एक ग्लास पाणी देऊन जिव वाचविला म्हणून TRP घेणारे तुम्हाला हजारो मिळतील परंतु या बैलाने आपल्या मालक आणि मालकिन यांच्यावर विज कोसळली आणि आजुबाजुला कोणी नसताना आपल्या मालक मालकिन यांना गावापर्यंत पोहचुन आपल्या मालकाला दवाखान्यात पोहोचवण्याची कामगिरी चोख पार पाडली.
हा बैल आहे लोणी घाट येथील शेतकरी बिभीषण कदम यांचा आणि याचं काम जरी शेतातील मशागत करणं असलं तरी हा बैल मात्र यांच्या कुटुंबियांचा जिवकी प्राण ठरला आहे.
त्याच झालं असं काहि दिवसा पुर्वी चौसाळा ते पाटोदा रोड लगत बीभिषण कदम व त्यांची पत्नी शेतात काम करत होते.
अचानक विजांच्या कडकडाटा सह पाऊस सुरू झाला आणि बिभीषण कदम आणि त्यांची पत्नी जिथे बसले होते तिथेच त्याच्या अंगावर विज कोसळली.
मालकाच्या अंगावर विज पडली यापासून हा बैल दुर होता. मालक मालकिन हे शांत पडले होते आणि हा त्यांच्याकडे एक टक सैरवैर पाहत हंबरडा फोडत उभा होता. शेवटी तो मुका प्राणी करणार तर काय करणार, कोणाला नावाने हाक मारून मदतीला बोलावू शकत नव्हता,परंतु काहि वेळ पाऊस झाला आणि पाणि वाहु लागलं अणि मालक आणि मालकिन यांच्या अंगावर पाणी आल्या नंतर त्यांना थोडं थंड वाटु लागलं आणि ते होशमध्ये आले. आग थोडी कमि झाल्याने कसे बसे बिभीषण कदम हे गाडिच्या चाकाला धरून गाडीत चढले आणि मालकिनीला पण आधार देत गाडितघेतलं आणि आपल्या या बैलाला नाव घेऊन हळुच विव्हळत म्हणाले “चलतो का?” हा मालकाचा आवाज ऐकताच या बैलाने पुढच्या दोन्ही पायांच्या गुडघ्यावर होऊन चिखलात रोवलेलं बैल गाडिचं जु उचलून आपल्या मानेवर घेतलं.
याने मानेवर जु घेतलेलं पाहुण दुसरा पण बैल आला आणि त्याने हि मान वाकवून जु खांद्यावर घेत आपल्या जोडीदाराला सहकार्य केल.
ना जुपणं ना मालकाच्या हातात कासरा तरी या बैलाने आपला प्रवास तिन किलोमीटर पार करत घर गाठलं.
मंग घरी आल्यावर मालकाच्या मुलाला पाहुण हंबरडा फोडला. आई आणि वडील गाडित झोपलेले आणि बैलाचा कासरा खालि लोळतोय तर जुपने लटकलेले आणि बैलाचा हंबरडा पाहून मालकाच्या मुलाने धावत गाडी जवळ गेला आणि आई वडिलांची अवस्था पाहून भयभित झाला.
त्याने गाडि बोलावून घेतली आई वडील यांना गाडीत घातलं आणि बीडचे रुग्णालय गाठले.
निर्जन ठिकाणी , ना जवळ मोबाईल, ना कोणी शेतात सेजारी माणुस अशा अवस्थेत जर बैल सतर्कता दाखवत नव्हता? तर आपलं काहि खरं नव्हतं असे बिभीषण कदम यांनी आपल्या भावना व्यक्त करून अश्रुला वाट मोकळी करून दिली आणि हा माझा खरा कुटुंबातील माणुस ठरला भाई असे उदगार भिषण कदम यांनी काढले.
तो बैल आज खरा मालकाचा हितचिंतक ठरला हे नक्कीच.( हिंद जागृती उपसंपादक मुस्तफा पठाण पत्रकार बीड) यांची बातमी