बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून मुक्या प्राण्यांसाठी केली पाण्याची व्यवस्था
https://vruttamasternews.com/65-2/
बुलडाणा /सिद्धार्थ पैठणे
भर उन्हात जीवाची लाही लाही होत असताना मुक्या प्राण्यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था व्यवस्था करून सामाजिक भान या उदात्त भावनेने येत्या 23 मे रोजी भगवान बुद्धाच्या बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून अंढे रा येथील स्त्री-पुरुषांनी मुक्या प्राण्यांना पिण्याचे पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून केलेला प्रयत्न. भर उन्हात माणसाला जशी दर सेकंदाला पाण्याची आठवण होते परंतु मुक्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी कोसन कोस भटकंती करावी लागते व त्यांना पिण्याचे पाणी मिळेलच याचीही शाश्वती नसते त्यामुळे घर उन्हात पावसासाठी भटकंती करण्याऐवजी जर त्यांना त्या ठिकाणीच पाणी मिळाले तरी त्यापेक्षा आणखीन मोठे पुण्य कोणते भगवान बुद्धाच्या सांगण्यानुसार व तेथीलपिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतरही ठिकाणी मुक्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तथा अनेक सामाजिक संघटनेकडून होत आहे त्यासाठी अंडेरा येथील महिला व पुरुषांनी एकत्र येऊन हा उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमामध्ये वन कर्मचारी श्री जीवन बिल्लारी व त्यांचे सहकारीपवन राठोड संतोष राठोड आकाश चव्हाण विठ्ठलं देशमुख मोहन चव्हाण ऋषीं तूपकर सागर परिहार व गावातील असंख्य महिला पुरुषांचा सहभाग होता यावेळी अशोक काकडे यांनी पाणी पुरवठा केला.