देऊळगाव राजा /प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे पोलिस स्टेशन म्हणून अंढेरा पोलिस स्टेशनला ओळखले जाते.अंढेरा पोलिस स्टेशनची हद्द जवळपास देऊळगावराजा,चिखली आणि सिंदखेडराजा या तीन तालुक्यांत विस्तारलेली आहे. जवळपास अनेक गावांचा कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी अंढेरा पोलिस स्टेशनची असते.मात्र गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे पोलीस स्टेशन ओळखले जाते.खुन,दरोडा,चोरी,महिला विनयभंग यांसारखे गंभीर स्वरूपाच्या घटना या पोलिस स्टेशन अंतर्गत नेहमीच घडलेल्या असुन ग्रामीण भागातुन सर्वात जास्त गुन्हे अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत घडतं असून
अंढेरा पोलिस स्टेशनच्या ठाणेदार पदी मागिल एक ते दीड वर्षापासुन विकास पाटील हे काम पाहत असुन त्याच्यां कार्यकाळात अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जवळपास सर्वच बिट मध्ये अवैध रेती वाहतूक, खुलेआम अवैध देशी दारू,वरली मटका,आॕनलाईन चक्री,तसेच मोठमोठाले पत्ता क्लब यांनी सगळीकडे धुमाकूळ घातला असून त्याची या ठिकाणावून तात्काळ बदली करा अन्यथा 23सप्टेंबर पासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यलया समोर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे तालुका प्रमुख अनिल चित्ते यांनी दिला आहे
जिल्ह्याला लाभलेले नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे
सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असुन जिल्हा पोलिस अधीक्षक हे प्रत्येक उपविभागीय कार्यालय ठिकाणी शांतता कमेटीची बैठक घेत असुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही म्हणून खबरदारी घेत असुन गणेश विसर्जन असो किंवा ईद एक मिलाद असो हे सण हिंदू मुस्लिम बांधवांनी शांततेत साजरे करावे यासाठी मार्गदर्शन करत आहेत.परंतु अंढेरा परिरसरात सुरू असलेले अवैध धंद्ये सुसाट सुरू असुन याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे हे काय कारवाई करणार याकडे आता नागरिकांचे लक्ष आहे
परिसरातील परिसरात रेती व अवैध धंदे बंद करणे ठाणेदार यांचे आद्य कर्तव्य असताना काही ग्रामस्थांनी अवैध धंदे बंद करा अशी मागणी केली असता संबंधित ठाणेदार यांच्या कडे केली मात्र थातूर मातुर कारवाई करून मोकळे होतात त्यामुळे ठाणेदार विकास पाटील यांना तात्काळ मुख्यालयी जमा करून त्यांची सखोल चौकशी करून परिसरात सुरू असलेले अवैध धंद्ये तात्काळ बंद न झाल्यास अनिल चित्ते यांनी आपल्या सहकाऱी सोबत दि.२३सप्टेंबर २०२४ पासुन जिल्हा पोलिस अधीक्षक किंवा पोलिस स्टेशन अंढेरा समोर अन्नत्याग करणार असल्याचा इशारा दिला आहे