सिंदखेडराजा /सुरेश हूसे- भारतीय कायदा जाणून घेण्याची उत्सुकता असलेल्या सर्व सामान्य व्यक्तीला नव्याने लागू करण्यात आलेल्या फौजदारी कायद्याची ओळख व समज व्हावी या हेतूने अधिवक्ता परिषद स्थापना दिनाच्या निमित्याने अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिवक्ता परिषदेच्या वतीने येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय सिंदखेड राजा येथे दि. २० सप्टेंबर, शुक्रवारी दुपारी २ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद खंडपीठाचे ॲड.आशिषजी जाधवर हे या अभ्यास वर्गात नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
सर्व वकील बंधूभगिनी, पोलिस अधिकारी, कर्मचारी व नवीन कायद्याची उत्सुकता असलेल्या नागरिकांनी ह्या अभ्यास वर्गाला उपस्थित राहण्याचे आवाहन बुलढाणा जिल्हा अधिवक्ता परिषदेचे ॲड.ज्ञानेश्वर जायभाये, तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. निशिकांत राजे जाधव तथा सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.