चिखली /सिद्धार्थ पैठने स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात दिनांक 26/ 9 /2024 वार गुरुवार दुपारी बारा वाजता रिपाई आठवले गटाचा पक्षप्रवेश सोहळा नरहरी गवई यांच्या अध्यक्षतेखाली थाटात संपन्न झाला. यावेळी प्रथम महापुरुषांच्या प्रतिमांना हार अर्पण करून वाजत गाजत ढोल ताशा व टाळ मृदंगाच्या गजरात कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळीमंचकावर जिल्हाध्यक्ष नरहरी गवई प्रा पठाण अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष आशाताई वानखेडे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आम्रपाल वाघमारे युवा नेते निळकंठ सोनवणे बाबुलाल इंगळे संतोष वानखेडे शोभा सुरडकर बाळासाहेब अहिरे केशवराव सरकटे भागवत साळवे दीपक साळवे विशाल गवळी प्रकाश पाटील खेडेकर महाराज हजर होते जिल्हाभरातील संपूर्ण महाराष्ट्रात कोठे नव्हे एवढी चिखली तालुक्याची सभा भव्य दिव्य झाली यावेळीबोलताना हिम्मतरावं जाधव यांनी आपण गेल्या पंधरा वर्षापासून मित्र पक्षाचे काम निमुटपणे आपण करत आलोय आणि आपण यापुढेही करणार परंतु कार्यकर्त्यांचे काय असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला दिवसेंदिवस कार्यकर्त्याची होत असलेली घालमेल पाहता रिपाई आठवले गटांनी चिखलीत मारलेली मुसंडी तालुकाध्यक्ष हिम्मतराव जाधव यांच्या कार्याची पावतीच आहे असे सर्वच स्तरातून आज म्हणण्यात आले कित्येक दिवसापासून एक पक्ष एकच नेता ही विश्वासार्हता टिकवून रिपाई पक्षाला जिल्ह्यातील मेहकर किंवा चिखली ची जागा विधानसभेसाठी सोडून घेऊ व सर्वच थरातील कार्यकर्त्यांनी न्याय देऊ असे उद्गार यावेळी हिम्मतराव जाधव यांनी नरहरी गवई साहेबांचे हात बळकट करा व तुमच्या प्रयत्न आम्ही वाया जाऊ देणार नाही असे उद्गार यावेळी हिम्मतराव जाधव यांनी काढले
. सामाजिक स्तरातील गोरगरीब कलावंत वृद्ध निराधार वेगवेगळे महामंडळ अण्णाभाऊ साठे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अपंग महामंडळ कलावंतांचे मानधन आपल्याला मिळणार की नाही या प्रश्नाने उपस्थित त्यांना निरुत्तर केले महिला आघाडी असो किंवा युवक आघाडी असो यासारख्या योजना पुढील काळात तुमच्यापर्यंत पोहोचवून देण्यासाठी तालुकाध्यक्ष महिला आघाडी तसेच जिल्ह्यातील रिपाई चे पदाधिकारी प्रामुख्याने तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतील अशी भावनिक सादही यावेळेस नरहरी गवई यांनी उपस्थित त्यांना घातली यावेळी सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रचना जाधव अर्चना बोर्डे मीना खरे उषा इंगळे मयूर बोर्डे राहुल गवई माऊली ज्ञानेश्वर काकडे हेमा पवार सह असंख्य महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते आम्रपाल वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन हिम्मतराव जाधव यांनी कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली