सिंदखेड राजा/ प्रतिनिधी देवखेड खापरखेड पूर्णा नदीवरील बांधारा, यामुळे पुराच्या पाण्याने वाहून गेलेली शेती, त्या शेती नदी लगत असलेली फळझाडे लावलेली बांबूची बेटे, आणि शेतीचे जमिनीचे झालेले नुकसान भरपाई तात्काळ मिळन्यात यावी याबाबत निवेदन देण्यात येवून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता परंतु कुठलीच कारवाई झाली नाही त्यामुळे ठरल्या प्रमाने उद्या पासून देवखेड खापर खेड बंधारा येथे आमरण उोषणाला शेतकरी बसणार आहेत.
पीडित शेतकरी देवखेडं शिष्टमंडळाचे नेतृत्व प्रवीण सरकटे, यांचे सह देवखेड चे सरपंच संजय अढाव वसंतराव गुमनराव भोसले, नारायणराव वसंतराव सरकटे, भारत वसंतराव सरकटे, घनश्याम गुमान राव भोसले शिवदास दत्तात्रय भोसले देविदास उत्तमराव भोसले विनायक संजय आढाव,आणि इतर पडीत शेतकऱ्यांच्या सह्या सह निवेदन देण्यात आले होते
जर 30 /9/ 2024 पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आम्ही देवखेड खापरखेड पूर्णा नदीवरील बंधारा येथे बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहोत असा इशारा देण्यात आला होता त्या प्रमाणे उद्या पासून सदर शेतकरी ऊपोषणास बसणार आहेत