बुलडाणा,(प्रतिनिधी )- मानवाच्या कल्याणासाठी आणि त्याला सन्मार्गावरून ढळू न देण्यासाठी सम्यक सम्बुद्धाचे उपदेश जना-जनाच्या कानावर सातत्याने आदळत ठेवणे आवश्यक असते.याचाच एक भाग म्हणून मातृतिर्थ बुलडाणा येथील लुंबिनी बुद्ध विहाराचे वतीने वर्षभर धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये आज दि २ आक्टोंबर २०२४ रोजी पू.भदंत डॉ राष्ट्रपाल महाथेरो तेलंगणा राज्य सदस्य अखिल भारतीय भिक्खू संघ यांच्या धम्मदेसनेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी आपल्या प्रवचनात डॉ.भदंत राष्ट्रपाल महाथेरो म्हणाले की, आज जो-तो म्हणतो कि, वाटल्यास माझे दान घ्या, परंतु विहारात येण्यासाठी,धम्म कार्य करण्यासाठी माझ्याकडे वेळच नाही. समाजाची ही वृत्ती, उदासिनता धम्म बांधवांमध्ये संस्कार रूजविण्यात, त्यांच्या मनाला वळण लावण्यत आणि पर्यायाने धम्म कार्यास मोठा अडथळा निर्माण करीत आहे.
आपल्या प्रवचनात पुढे ते म्हणाले की, आज मानसाजवळ सर्व काही असूनही तो स्वतःला असुरक्षित समजत आहे. भय, चिंता,राग, द्वेष या विकाराने ग्रस्त आहे. मनावर संस्कार होत नसल्यामुळे दुर्गुणांचा बळी तो ठरत आहे, मनोविकाराला बळी पडत आहे, अकुशल कर्म त्याच्याकडून घडत आहेत. बुद्ध तत्त्वज्ञानाने त्याची यामधून सुटका होने शक्य असल्याचे त्यांनी यावेळी आपल्या धम्म देशनेमधून सांगितले.
धम्म देशाने पुर्वी परीसरातील श्रद्धावान उपासिका आयु. आशाताई सोनटक्के यांचेकडून उपस्थितांना खिरदान करण्यात आले.
यावेळी परीसरातील असंख्य उपासक आणि उपासिका उपस्थित होत्या.