बुलढाणा/पुरुषोत्तम बोर्डे मेहकर लोणार मतदार संघातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा परिवर्तन मोर्चा ३ ऑक्टोबर रोजी सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात शिवसेना कार्यालय ते तहसिल कार्यालयावर काढण्यात आला होता, सद्या सोयाबीन सोंगणी जोरात असून शेतमजूर गोरगरीब जनतेसाठी हा अत्यंत महत्त्वाचा हंगाम आहे असताना सुध्दा या मोर्चाला प्रचंड गर्दी होती, या मोर्चाची सुरुवात झाली तेंव्हा पासून जिल्हा संपर्कप्रमुख प्रा नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जलिंधर बुधवत, उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे,शहर अध्यक्ष किशोर गारोळे, निंबाभाऊ पांडव,सुभाष हिवाळे, ॲड,आकाश घोडे, दिपक मापारी, दिलिप वाघ, एन ए बळी, माजी नगसेवक अशोक अडेलकर ॲड. संदिप गवई ॲड.सुमित सरदार हे मोर्चा सुरु झाला तेंव्हा पासून मोर्चात सहभागी झाले होते, मात्र आमदारकीचे डोहाळे लागलेले जिल्हा संघटक डॉ गोपाल बच्छिरे हे मोर्चा सभास्थळी पोहचल्यावर दोन तीन मान्यवरांचे भाषण झाल्या नंतर पाच सहा कार्यकर्त्यांना घेऊन सभास्थळी पोहोचले कार्यकर्ते बिचारे पाच-सात त्यांच्या हातात बॅनर ही झळकत होते, अन जिल्हा संघटक स्टेजवर जाऊन बसले जिल्हा संघटक या नात्याने बोलण्याची संधी मिळाली म्हणून नेहमी प्रमाणे भाषण केले, त्या भाषणात त्यांनी वारंवार शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा, आक्रोश मोर्चा असा उल्लेख केला.मात्र तो आक्रोश मोर्चा नसून जनतेचा परिवर्तन मोर्चा होता या मतदार संघात परिवर्तन केल्याशिवाय या शेतकऱ्यांना, बेरोजगार तरुणांना, व्यापारी वर्गाला, महिलांना न्याय मिळणार नाही आणि केवळ आक्रोश करून चालणार नाही तर परिवर्तन हीच काळाची गरज समजून सिद्धार्थ खरात यांनी परिवर्तन मोर्चाचे आयोजन केले होते, मात्र स्वतः ला उच्च शिक्षित आहे असे जनतेला ठासून सांगायचे आणि साधे पाठीमागे काय बॅनर लावले तेही वाचता येऊ नये अशी फसगत, यातून त्यांना आमदारकीचे कीती डोहाळे लागलेत हे मात्र दिसून येत आहे, आणि त्यांना शेतकऱ्यांचा पुळका आहे असे दाखवण्याच्या प्रयत्नात त्यांनी स्वतः स्वतंत्र निवेदन सादर केले आणि मर्जीतल्या दोनचार पोर्टल ला बातम्या देऊन आपला उदोउदो करून घेतला, मात्र शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख खेडेकर, जिल्हा प्रमुख बुधवत, सिद्धार्थ खरात व पदाधिकारी यांनी रीतसर निवेदन सादर केले त्या वेळी मात्र प्रा बच्छिरे कुठे दिसले नाही, त्या नंतर आपल्या दोन-चार कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दुसरे निवेदन सादर केले, यातून त्यांना जिल्हा संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, जिल्हा उपप्रमुख आशिष राहटे यांच्यासह पदाधिकारी यांच्यावर भरोसा नाही काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर बच्छिरे यांचा स्वतंत्र गट आहे काय? का मेहकर येथील शिवसैनिकांमध्ये दुफळीचे वातावरण निर्माण करण्याचे कटकारस्थान बच्छिरे करत आहेत काय? असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत आणि त्यातून जनतेमध्ये संभ्रम अवस्था दिसून येत आहे.
Offcanvas menu