सिंदखेड राजा/प्रतिनिधी स्वर्गीय समिंद्राबाई अण्णाजी लंके व स्वर्गीय मनोहरराव नामदेवराव लंके यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त देऊळगाव राजा तालुक्यातील किन्हीपवार येथे जिजामाता हॉस्पिटल व महिला आरोग्य केंद्र द्वारा संचलित जिजामाता नेत्रालय सिंदखेडराजा व मानव विकास प्रतिष्ठान बुलढाणा संचलित राजमाता हॉस्पिटल देऊळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आले होते.सदरील शिबिरामध्ये मोफत मोतीबिंदू , काचबिंदू,मधुमेह,रक्तदाब,
मुळव्याध, बालरोग,त्वचारोग यासह इतर तपासण्या मोफत करण्यात आल्या त्याचबरोबर रुग्णांना मोफत गोळ्या औषधींचे वाटप करण्यात आले असून सदरील शिबिराचा २४० रुग्णांनी लाभ घेतला.यावेळी राजमाता हॉस्पिटलचे संचालक डॉ.गोरखनाथ आढाव पाटील,जिजामाता नेत्रालयाचे समाधान देशमुख,सिमोल भालेराव, बाळासाहेब कठोरे,शत्रुघ्न देशमुख आयोजक अनिरुद्ध लंके,नामदेव लंके,जगदीश लंके,दीपक लंके यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.