आशिष रहाटे यांच्या हस्ते लघु उद्योग मार्गदर्शन फिरत्या रथाचे उद्घाटन संपन्न 

मेहकर/प्रतिनिधी दि.14 ऑक्टोबर 2024 उत्कर्ष फाऊंडेशन च्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, कृषी, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिता साठी उत्कर्ष फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात, त्याचाच एक भाग म्हणून

मेहकर-लोणार मतदार संघातील तरुण मुले आणि मुलींसाठी रोजगाराची नवीन संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘स्किल ऑन व्हील’ हा उपक्रम अंतर्गत मेहकर-लोणार मतदार संघातील सुशिक्षित तरुण बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने कौशल्य विकास लघु उद्योग मार्गदर्शन फिरत्या रथाचे उद्घाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशिष भाऊ रहाटे, शिवसेना नेते सिद्धार्थ खरात,तालुकाध्यक्ष निंबाजी पांडव, युवा तालुका प्रमुख ॲड. आकाश घोडे,मेहकर शहरप्रमुख किशोरभाऊ गारोळे पत्रकार राजेश देशमाने, लोणी गवळी सर्कलचे सर्कल प्रमुख भागवत बोरकर यांच्या हस्ते शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जनसंपर्क कार्यालय,मेहकर येथे उद्घाटन करण्यात आले. या वेळी आशिष रहाटे म्हणाले की उत्कर्ष फाऊंडेशनच्या या उपक्रमाचा येथील तरुणांना फायदा होईल. येथील

शाळा, कॉलेज आणि महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी तसेच शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना देखील ‘कौशल्य शिक्षणाची’ तोंडओळख करून देण्याचे काम या उपक्रमाच्या माध्यमातून केले जाणार आहे. या कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगाराची अमूल्य संधी आपले सहकारी सिद्धार्थ खरात यांनी उपलब्ध करून दिली त्या संधीचे आपण सोने करावे असेही आशिष रहाटे यांनी यावेळी सांगितले तर या भागातील नवीन उद्योग, व्यवसाय व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या तरुणांना, शेतकऱ्यांना, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे कौशल्य ओळखून सोयीस्कर व्यवसाय आणि इतर पर्यायी व्यवसाय वाढीसाठी लागेल ते मार्गदर्शन, तसेच या भागात दुग्ध व्यवसाय, गाई पालन, मत्स्य पालन खेकडा पालन शेळीपालन कुक्कुटपालन सेंद्रिय शेती यासह इतर शेती पुरक व्यवसाय वाढीसाठी आवश्यक ती मदत करणार असल्याची ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *