बुलडाणा,(प्रतिनिधी)- बुलडाणा जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते पत्रकार बाबासाहेब जाधव व शासकीय निवासी आश्रमशाळा वळती तालुका चिखलीचे मुख्यध्यापक शशिकांत जाधव यांनी नव्यानेच बुलडाणा येथे सुरू झालेल्या शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन (प्रमुख) म्हणून डॅा. कैलास झिने यांनी पदभार स्वीकारला आहे त्यांची सदइच्छा भेट घेतली व त्यांचा पुष्प गुच्छ देवून बाबासाहेब जाधव व शशिकांत जाधव यांनी सत्कार केला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा ! दिल्या.
बुलडाणा जिल्ह्यात प्रथमच पाहीले नवीनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले व या नविनच वैद्यकीय महाविद्यालयाचे पहीले डिन मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील ग्राम हातोडी बु।। गावात झाले व योगायोग असा की, याच हातेडी बु।। गावातीलच आदर्श शिस्तप्रिय शिक्षक स्मृतीशेष उकर्डा रामभाऊ झिने गुरूजी व माता जिजाआई याचे सुपुत्र हतेडी बु।। चे भूमीपूत्र डॅा. कैलास उकर्डा झिने हे संभाजी नगर औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून पदोन्नतीवर आपल्या स्व जिल्ह्यातील व आपल्या जन्मभूमीतच हतेडी बु।। येथील रहिवासी सासरे स्मृतीशेष रामभाऊ जाधव, साले माजी सैनिक प्रभाकर जाधव यांच्या इकलासच्या शेतावर नविन स्थापन झालेल्या शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन (प्रमुख) म्हणून पहीली नेमनूक झाली हा कीती मोठा शर्करा योग म्हणावा लागेल. ही बुलडाणा जिल्ह्यासाठी व ग्राम हातेडी बु।। गावांसाठी अभिमानाची स्वाभिमाची बाब आहे. हतेडी बु।। या लहानशा खेड्यातून प्राथमिक शिक्षण घेवून पूढे वैद्यकीय शिक्षण कठीण खडतर परिस्थितीत करून कॅालेजच्या सुटीत हातेडीच्या सार्वजनिक डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळील दिव्या खाली अभ्यास करून संघर्षमय जीवन जगून शिक्षण घेतले व वैद्यकीय शाखेतील उच्चत्तम पदवी घेतली. शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे हा डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचा मूलमंत्र वडीलांन पासून रक्तात असल्यामुळे तो त्यांनी आत्मसात घेऊन ते या पदावर पोहचले. गरिबी व परिस्थीती मुळे शिकलो नाही हा गैरसमज आजच्या मुलांत आहे त्या गैरसमजाला छेद देत त्यावरही मात करता येते फक्त जिद्द व चिकाटी मेहनत असावी लागते ते त्यांनी प्रतेक्षात स्वतः करून दाखवीले व ते या उच्च वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदावर गेले.त्यांच्या त्या जिद्द व चिकाटी,मेहनत आणि संघर्षाची समाजातील मुलांनी हा त्यांचा आदर्श घ्यावा की, गरिबी व परिस्थीतीवरही मात करता येते हे दाखवून दिले व ते आज ह्या उच्च पदावर पोहचले.