बुलढाणा/ प्रतिनिधी धुळे येथे दि. 21 ऑक्टोंबर 2024 ला संपन्न झालेल्या आझाद समाज पार्टी (कांशीराम) च्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. आनंदजी लोंढे यांच्या मार्गदर्शना अंतर्गत युवकांचे प्रेरणास्थान, बहुजन नायक, संघर्ष नायक प्रेरणा स्रोत खा.भाई चंद्रशेखर आझाद यांची धुळे या ठिकाणी बहुजन हक्क परिषद सभा अतिशय उस्फूर्तपणे पार पाडली. यावेळी हजारो लाखो च्या संख्येने सर्व समाज बांधव जनसमुदाय उपस्थित होते. यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर आझाद समाज पार्टी बुलढाणा जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखेडे सारख्या कार्यकर्त्या च्या स्वतः खा. भाई चंद्रशेखर आझाद यांनी जवळ येऊन पुष्पहार गळ्यामध्ये टाकून सन्मान केला.
सिद्धांत वानखेडे बुलढाणा जिल्हाध्यक्ष आझाद समाज पार्टी
यावेळी सिद्धांत वानखेडे म्हणले की . माझ्या आतापर्यंतच्या भीम आर्मी, आझाद समाज पार्टी च्या तथा सामाजिक संघर्षाची खऱ्या अर्थाने मला पावती मिळाल्या सारखी वाटली. गेल्या सात आठ वर्षापासून भाईंच्या नेतृत्वामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जडण घडण होत असतानी एवढ्या मोठ्या नेतृत्वाने माझ्या पाठीवर सन्मानाची थाप थोपटणे हे मी माझं भाग्य समजतो.. यावेळी आझाद समाज पार्टी बुलढाणा टीम उपस्थित होती त्यामध्ये संदीप भाई इंगळे, ,प्रवीण भाऊ गवई मयूर भाई खंडारे ,धनराज भाई गोळे ,सावन भाऊ सरकटे कंकाळ साहेब, अमोल भाऊ गवई शरद भाऊ सरकटे असे एक ना शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने उपस्थित होते.