सिंदखेडराजा/ प्रतिनिधी सिंदखेड राजा मतदार संघात आज अर्ज भरण्याच्या शेवट च्या शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी अर्ज भरण्यासाठी महायुतीच्या मतदारसंघातील कार्यकर्त्याची प्रचंड रैली ची तयारी सुरू असतानाच अजित पवार गटाचे उमेदवार मनोज कायंदे याना ए बी फॉर्म देवून त्यांचा जिल्हाध्यक्ष अँड नाझेर काझी यांच्या हस्ते प्रवेश देण्यात आला प्रवेश होताच मनोज कायंदे यांनी रैली ने जावून अर्ज भरला
त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉ शशिकांत खेडेकर यांची राजवाड्या समोर सभा होवून त्यांनी रैली काढून आपला उमेदवारी अर्ज भरला
सिंदखेडराजा मतदार संघात आज महायुती च्या दोन्ही घटक पक्षाने आपल्या उमेदवारांना ए बी फॉर्म देवून उमेदवारी अर्ज भरायला लावले असल्याने महायुती चां महत्त्वाचा घटक असलेला भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यां सह पदाधिकारी बुचकाळ्यात पडले असून
नेमके अजित पवार यांच्या उमेदवारा सोबत जावे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या पक्षाच्या उमेदवारा सोबत जावे हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे आज दिसून आले भाजपा चे काही पदाधिकारी डॉ शशिकांत खेडेकर यांच्या सोबत तर काही पदाधिकारी मनोज कायंदे यांच्या सोबत दिसून आले एकंदरी महायुतीच्या जागा वाटपात झालेल्या क्लिष्ट प्रकारामुळे भाजपा कार्यकर्ते यांच्या वर कोणता झेंडा घेवू हाती असे म्हणण्याची पाळी आली आहे मात्र उद्या 30 ऑक्टेंबर रोजी झालेल्या छाननी नंतर 4 तारखेला अर्ज मागे घेण्याच्या दिवसा पर्यंत काय राजकीय घडामोडी घडतात याकडे संपूर्ण मतदार संघाचेच नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे