आझाद समाज पार्टीच्या वतीने मेहकर मतदार संघात संदीप भाऊ खिल्लारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बुलढाणा सचिन खंडारे मेहकर मतदार संघामध्ये अनेकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे २९ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे काही पक्षातील उमेदवारांनी तर काही अपक्ष उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहे .

मेहकर मतदार संघामध्ये गेल्या दोन महिन्यापासून लोकांच्या भेटी घेत असलेले आझाद समाज पार्टीचे तरुण तडफदार उमेदवार युवकाचे मजबूत संघटन असलेले संदीप भाऊ खिल्लारे यांनी आपला उमेदवारी अर्ज 29 ऑक्टोबर रोजी दाखल केला आहे ‘
आपल्या समर्थकासह फटाक्याच्या आतिषबाजी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ‘ सुरुवातीला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ‘महात्मा ज्योतिबा फुले ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ‘ त्याचबरोबर पीरबाबा दर्ग्यावर चादर चढून आशीर्वाद घेऊन सदर उमेदवारी अर्ज दाखल केला ,यावेळी त्यांच्यासोबत
प्रवीण गवई जिल्हा संपर्कप्रमुख आझाद समाज पार्टी ,संदीप इंगळे महासचिव आझाद समाज पार्टी बुलढाणा , मेहकर तालुकाध्यक्ष राहुल मोरे ‘ तालुका उपाध्यक्ष अमोल गवई ,सचिन खंडारे ,बबन सरकटे , सावन सरकटे ,माधवराव सरकटे किरण इंगळे ,ठोके ‘ मिलिंद खडसे ,गणेश चव्हाण ,विजय नरवाडे , अडागळे ,,पंजाब कंकाळ , गुलाब कंकाळ ,
शेख ,संतोष जैस्वाल , अस्लम मंजूम ,यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यावेळी हजर होते .

प्रतिक्रिया

आझाद समाज पार्टी यांच्यावतीने
मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे खासदार चंद्रशेखर आझाद यांचे मनापासून धन्यवाद त्यांनी मला उमेदवारी दिली . मेहकर मतदार संघात विकास करण्यासाठी त्याचबरोबर राहिलेले कामे पूर्ण करण्यासाठी मी लढा उभारत आहे अनेक लोकांचे समर्थन मला असून अनेक पक्षांचा सुद्धा पाठिंबा आहे त्यामुळे मेहकर मतदार संघात परिवर्तन घडवण्यासाठी मी निवडणुकीत उभा असून लवकरच मेहकर येथे परिवर्तन सभा आयोजित केली जाणार आहे .
संदीप खिल्लारे
अधिकृत उमेदवार आझाद समाज पार्टी मेहकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *