बुलडाणा,(प्रतिनिधी)-देशात लोकसभेच्या व राज्यात विधान सभेच्या निवडणूका झाल्या पण भाजपचा जूना मित्र असलेला रिपाई आठवले गटाला एकही जागेवर उमेव्दारी दिली नाही त्यामुळे संपूर्ण रिपाई कार्यकर्ते नाराज होते पण मित्रत्व जपण्यासाठी व माननिय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, लोकनेते भारत सरकारचे गृह मंत्री अमित शाहा साहेब,भाजपचे व जनतेचे लोकप्रिय माननिय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शब्द दिला व आश्वासन रिपाईचे राष्ट्रीयध्यक्ष, दिनदुबळ्याचे ह्रदयसम्राट, लोकनेते, मित्रासाठी त्याग करणारे त्यागमृर्ती केंद्रीय समाजीक न्याय राज्यमंत्री भारत सरकार डॅा. रामदासजी आठवले साहेब यांनी मित्रत्वासाठी त्याग करून मित्रत्व जपण्यासाठी भाजपला व महायुतील बिनशर्त पाठिंबा दिला विजयी करण्यासाठी स्टार प्रचारक म्हणून लोकसभेच्या व विधानसभेच्या वेळेस आहोरात्र मेहनत घेऊन महायुतीचा प्रचार करून केंद्रा मध्ये व राज्यामध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून दिले.आता त्या मित्राच्या त्यागाचा व दिलेल्या आश्वासनाचा महायुतीने विचारकरून आठवले गटाला राज्याच्या मंत्रीमंडळात सामावून घ्यावे व विधान सभेवर व महामंडळावर रिपाई जून्या मित्राला दिलेल्या आश्वासना प्रमाणे शब्द पाळून समाविष्ट करावे.
रिपाईत व आठवले साहेबांनवर संपूर्ण हायात गेली असे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबूरावजी कदम, राष्ट्रीय नेते अविनासजी माहातेकर, राज्य सरचिटणीस गौतमजी सोनावणे, प्रदेश युवाध्यक्ष पप्पु कागदे, राज्यउपाध्यक्ष ॲड.ब्रम्हानंद चव्हाण, राष्ट्रीय सचिव दयाल बाहादुरे यांना मंत्री मंडळात घ्यावे व विदर्भातून महामंडळावर ज्यानी आहेरात्र आंबेडकरी चळवळ रिपाई आठवलेंचे ध्येय धोरण गावखेड्या पर्यंत असेल त्या परिस्थितीत फिरून रिपाईचे विचार पेरले असे रामदासजी आठवलेंवर जिवापाड प्रेम करणारे विदर्भाचे नेते रिपाईचे महाराष्ट्र संघटक पॅंथर सुधाकर तायडे यांना कोणत्याही एका महामंडळावर घ्यावे आशी मागणी बुलडाणा जिल्हा रिपब्लीकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाच्या वतीने महायुतीचे व भाजपचे सर्वेसर्वा आदर्णिय देवेंद्रजी फडणवीस साहेब व आमचे राष्ट्रीय नेते डॅा. रामदासजी आठवले साहेब यांचे कडे बुलडाणा जिल्हा रिपाईचे जिल्हा प्रभारीध्यक्ष मा.जिल्हाकार्यध्यक्ष पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे विनंती केली आहे.