मेहकर /प्रतिनिधी येथील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी मेहकर मतदार संघाचे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जलजिवन मिशन, विजवितरण विभागाचा आढावा घेतला. तेंव्हा विकासाची आकडेवारी समोर येताच आमदार सिद्धार्थ खरात हे संताप व्यक्त करत म्हणाले की एवढा विकासाचा ढोल बजावला गेला तो तर “खोदा पहाड निकला चुहा ” अशी परिस्थिती आहे.असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला# आ.खरात पुढे म्हणाले की विकासाच्या आकडेवारी चे जे बॅनर लावले गेले,तो विकास म्हणजे फक्त आणि फक्त कागदावर आहे, तर अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत,अनेक कामे मंजूर आहेत परंतु यांना सोईचे राजकारण करण्यासाठी ते मुद्दाम प्रलंबित ठेवल्याचे मत व्यक्त केले, तर आता निवडणुक झाली आहे आता शेत रस्ते,पांदण रस्ते जलजीवन मिशन अंतर्गत गावाला पिण्याच्या पाण्याची, व्यवस्था करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, वारकरी चळवळीला बळ देणार आहे, पत्रकार बांधवांना. सुसज्ज असे पत्रकार भवन उभारणार आहे, दुभाजक बाबतीत सर्वसमावेशक भूमिका घेणार, रस्ते रुंदीकरण करायचे असतील तर तेथे जे टपरीधारक आहेत आधी त्यांचा विचार केला जाईल, विकास आणि विकासाच्या मुद्यावर राजकारण, समाजकारण केले जाईल,लाडक्या बहिणीसाठी तुर ,कापूस आणि सोयाबीन ला भाव व लाडक्या भावांच्या हाताला काम देणार असल्याचे सांगितले, तसेच मेहकर बसस्थानक इमारतीची चौकशी लावणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर जर राजकारण करता, त्यांचे विचार पेरण्याचे काम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आत्तापर्यंत का बसवला नाही असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. विकासाबाबत माझे काही आराखडे आहेत. येत्या बजेटमध्ये पाच पट विकास कामांचे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या विकास कामांचा बॅकलॉग भरून काढणार असल्याची ग्वाही देत मार्च अगोदर प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले.#.
पत्रकार परिषदेत ते पुढे बोलले की
पराभूत होऊनही आमची विजयी मिरवणूक अडवली ते त्यांचे संस्कार! पण तरीही मी शुभेच्छांची वाट पाहतोय.
राजकारणात जय पराजय हा नेहमी होतच असतो, परंतु ज्यांचा विजय झाला त्यांनी उत मात करायचा नसतो,आणि ज्याचा पराजय झाला त्यांनी खजील होऊन कपटी राजकारण करु नये, आमचा विजय झाला आम्ही माघार घेतली ते आमचे संस्कार आहेत महाराष्ट्र हा सुसंस्कृत सुजान नागरिकांचा आहे तरुणांचे आयुष्य बरबाद होऊ नये म्हणून आम्ही माघार घेतली, परंतु त्यांनी पराभव होऊनही आमची विजयी रॅली अडवली काय जो गोंधळ घातला, वाईट साईट वक्तव्य केले हे त्यांचे संस्कार आहेत, परंतु आता राजकारण संपले आहे आपला विजय झाला आहे आता त्यांचे माझे वैयक्तिक काही वैर नाही त्यांनी त्यांच्या अनुभवा नुसार मार्गदर्शक सूचना कराव्यात. आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात पराजित झालेल्यांनी विजयी झालेल्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत ती संस्कृती महाराष्ट्राची आहे मी सुद्धा त्यांच्या शुभेच्छांची वाट पाहतोय अशी भावनिक साद सुद्धा घातली आहे.पत्रकार परिषदेला उपजिल्हा प्रमुख प्रा.आशिष रहाटे, काँग्रेसचे विधानसभा नेते अनंतराव वानखेडे,तालुका प्रमुख निंबाजी पांडव,रा.काँ तालुका अध्यक्ष दत्ता पाटील घनवट,,रा.काँ.जिल्हा उपाध्यक्ष निसार अन्सारी,शहर प्रमुख किशोर गारोळे, युवा सेना तालुका अधिकारी आकाश घोडे, शहर अधिकारी ऋषी जगताप, अँड.बाळासाहेब गवई ,साहेबराव हिवाळे सह पदाधिकारी उपस्थित होते