बुलडाणा,(प्रतिनिधी)- बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाची जिल्हा बैठक न्यु बालाजी हॅाटेल जालणा रोड देऊळगाव राजा येथे दि. १ डिसेंबर २०२४ रोज रविवारला संपन्न झाली या जिल्हा बैठकीचे आध्यक्ष रिपाई प्रदेश संघटक तथा बुलडाणा जिल्हा निरिक्षक सुधाकर तायडे होते तर प्रमुख उपस्थीतीत प्रभारी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जाधव, जिल्हामहीलाध्यक्ष वंदनाताई वाघ,विदर्भसंघटक भाऊसाहेब सरदार, रिपाई कर्मचारी फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर विजय मोरे,जिल्हामहासचिव मुरलीधर गवई,विदर्भ सचिव विजय सपकाळ, विदर्भउपाध्यक्ष संजय वाकोडे, जिल्हयुवाध्यक्ष विजय साबळे, अल्पसंख्यध्यक्ष प्रा.मुक्तार पठाण, विदर्भ महालाउपाध्यक्ष आशाताई वानखडे,जिल्हाउपाध्यक्ष दत्ता पाटील,युवानेते प्रकाश पाटील होते.
सर्व प्रथम डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. नंतर मातृतिर्थ सिंदखेड राजा मतदार संघातून नव्याने निवडूण आलेले आमदार मनोज देवानंद कायंदे साहेब व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल कायंदे, समतापरिषदेचे संतोष खांडेभराड यांचा शाल पुष्पगुच्छ देवून जिल्ह्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या बैठकीत बुलडाणा जिल्हा तालुखाध्यक्ष बुलडाणा केशव सरकटे, चिखली हिम्मतराव जाधव, लोणार समाधान सरदार, सिंदखेडराजा रमेश पिंपळे, मोताळा बाळासाहेब आहिरे, मलकापूर दिलीप इंगळे, नांदुरा पत्रकार शैलेश वाकोडे, खामगाव निळकंठदादा सोनोने, संग्रामपूर बाबूलाल इंगळे, शेगाव सुरज शेगोकार, जळगांव जामोद संतोष वानखडे, देऊळगाव राजा प्रदिप मुखदयाल व संपूर्ण जिल्ह्यातील जिल्ह पदाधिकारी, ग्रामीण, शहर ,महीला आघाडी व सर्व आघाड्यांचे व जिल्हा तालुख्यातील पदाधिकारी यांच्या उपस्थीत जिल्हा बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय आध्यक्ष सामाजिकन्यायराज्य मंत्री भारत सरकार डॅा. रामदासजी आठवले साहेब यांना तिसऱ्यांदा भारत सरकारच्या मंत्री मंडळात घेतल्या बद्दल एनडीए व मानिनिय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब व देशाचे गृहमंत्री अमित शाहा साहेब यांचे अभिनंदन व धन्यवाद मानन्यात आले.
महाराष्ट्राच्या महायुतीच्या नविन सरकार मध्ये रिपाई आठवले गटाला एक मंत्री पद व एक एमएलसी द्यावी व महामंडळावर व शासकीय समित्यांवर आश्वासना प्रमाणे रिपाईच्या कार्यकर्त्यांनी घेण्यात यावे.
महायुतीच्या नविन होणाऱ्या मंत्री मंडळात रिपाई राष्ट्रीय महीलाध्यक्षा सिमाताई रामदास आठवले यांना घेण्यात यावे.
या बैठकीत आशा प्रकारच्या मागण्या ठरावाव्दारे मांडण्यात आल्या. बुलडाणा रिपाई जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नरहरीदादा गवई यांनी ११ नोव्हेंबर २०२४ रोजी पत्रकार परिषद घेवून पदाचा व पक्षाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त पदी जिल्हाकार्ध्यक्ष बाबासाहेब जाधव यांना तात्पुरते प्रभारी जिल्हाध्यक्ष केले होते.
राजीनाम्यामुळे रिक्त झाले पदाची निवड करावयाची होती राष्ट्रीय आध्यक्ष डॅा. रामदासजी आठवले यांचे आदेशानुसार बुलडाणा जिल्ह्याला एक संपर्क प्रमुख व दोन जिल्हध्यक्ष घाटावरील व घाटाखालील असे देण्याचे होते त्यानुसार सर्व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तालुखाध्यक्ष यांनी आपआपले विचार मांडले व सर्वानुमते जिल्हा संपर्क प्रमुख पदी बाबासाहेब जाधव तर दक्षिण (घाटावरिल) इंजिनियर शरद खरात, उत्तर (घाटाखाली) भाऊसाहेब सरदार तर जिल्हामहिलाध्य पदी वंदनाताई वाघ यांच्या नावाची व पदाची घोषणा प्रदेश संघटक तथा बुलडाणा निरिक्षक सुधाकर तायडे यांनी केली.
या महत्वपूर्ण बैठकीचे प्रस्ताविक शरद खरात तर सुत्रसंचलन बाबासाहेब जाधव व आभार प्रदिप मुखदयाल यांनी केले.
Offcanvas menu