जानेफळ पोलीस स्टेशनला आमदार सिद्धार्थ खरात यांची सदिच्छा भेट…  पो.स्टे अंतर्गत पोलिसांना येणाऱ्या अडचणी घेतल्या जाणून 

मेहकर/प्रतिनिधी जानेफळ पोलीस स्टेशनला नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ रामभाऊ खरात यांनी दोन डिसेंबर 2024 ला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत महविकास आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सुरुवातीला ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांचा शाल श्रीफळ देऊन स्वागत केलं तर आमदार सिद्धार्थ खरात यांनी ठाणेदार यांच्याकडून ठाण्या अंतर्गत येणाऱ्या एकूण गावांची माहिती घेतली तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्याकडून सविस्तर अशी माहिती घेतली यावेळी ठाणेदार यांनी कर्मचारी संख्याबळ कमी असल्याने ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यास असमर्थ असल्याने रिक्तपदे भरल्यास ताण कमी होईल असे सांगितले यावेळी आमदार महोदयांना त्यांनी सांगितलं एकूण 42 खेडे असून यामध्ये 28 कर्मचारी कार्यरत असल्याचं ठाणेदार यांनी सांगितले तर नायगाव देशमुख ते सारशिव या टोकापर्यंत पोलिसांना काम कराव लागत असते आणि यामुळे पाहिजे त्या प्रमाणात पोलीस संख्या बळ हे नसल्यामुळे या संदर्भात ठाणेदार यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांना सविस्तर माहिती दिली व कर्मचारी वाढीसंदर्भात तसेच नव्याने देऊळगाव साखरशा येथे पोलीस चौकी संदर्भात प्रयत्न करावेत अशा प्रकारची विनंती केली… तर आमदार सिद्धार्थ खरात त्यांनी सविस्तर माहिती लिहून घेत या प्रकरणी आपण जातीने लक्ष घालून यासाठी प्रयत्न करत करणार असल्याचे ठाणेदार यांना सांगितले

 

यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष देवानंद पवार, अँड गणेश देवकर ,माजी सरपंच गणेश पाखरे ,शहर प्रमुख बाळाभाऊ पाखरे , पत्रकार गणेश सवडतकर,पत्रकार सय्यद मेहबूब यांच्या सह महाविकास आघाडी चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *