मेहकर/प्रतिनिधी मेहकर बार असोसिएशन येथे मेहकर लोणार मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थजी खरात यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना आमदार सिद्धार्थ रामभाऊ खरात म्हणाले की राजकीय सत्तेवर बसलेल्यांच्या हाती देश मजबूत आहे असे समजू नका कारण देश भयंकर अडचणीत आहे लोकशाही व्यवस्था लोकशाही संस्था ठिसूळ होत आहेत त्यांना कमकुवत करण्याचे पाप या देशात सुरू आहे म्हणून तुम्ही जरी जरी सत्तेत नसले तरी तुम्ही सत्तेपेक्षा कमी नाही असे माझे मत आहे म्हणून लोकशाही व्यवस्था लोकशाही संस्था मजबूत करण्यासाठी आपण एकसंघ प्रयत्न करू असे ठाम मत नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर न्यायालयात वकिल संघाने केलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना आपले ठाम मत मांडले, या भव्य दिव्य सत्कार समारंभाला वकील संघाचे अध्यक्ष ॲड.निखिल मिटकरी उपाध्यक्ष ॲड संदीप वाघमारे. सचिव ॲड समाधान कटारे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये लक्ष्मण दादा घुमरे किशोर गारोळे, तर ॲड अनंत वानखेडे. ॲड .आकाश घोडे ॲड संदीप गवई. ॲड विजय मोरे. ॲड .नवघरे ॲड.लांडगे व बार असोसिएशनचे सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड धोंडगे यांनी केले तसेच मेहकर बार संदर्भाने असलेल्या समस्यावर ॲड.मिटकरी यांनी आपले मत व्यक्त केले तसेच ॲड अनंत वानखेडे.यांनी सुद्धा वकिलांच्या एकूण समस्या बाबत तसेच विद्यमान आमदार सिद्धार्थजी खरात यांच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमांमध्ये आमदार सिद्धार्थजी खरात साहेब यांनी वकिल संघाच्या समस्या एकूण घेऊन त्यांनी केलेल्या मागण्या लवकरच पूर्णत्वास नेण्याची ग्वाही दिली भव्य दिव्य इमारत व लायब्ररी निर्माण करू असे आश्वासन दिले व सरते शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲड वाघमारे यांनी केले कार्यक्रमाला महिला वकील. तसेच जूनियर व सीनियर विधीज्ञ यांच्या उपस्थितीमध्ये मेहकर बार असोसिएशनचे सर्व सदस्य यांनी विद्यमान आमदार सिद्धार्थजी खरात यांचा सत्कार केला तर न्यायालयायातील कारकून असोसिएशनचे अध्यक्ष. उपाध्यक्ष. सचिव. यांनी विद्यमान आमदार सिद्धार्थजी खरात यांना शारंगधर बालाजी यांची प्रतिमा भेट दिली दिली राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता झाली.
Offcanvas menu