सिंदखेडराजा/ प्रतिनिधी पळसखेड चक्का तालुका सिंदखेड राजा येथे शहीद नायक प्रदिप साहेबराव मांदळे यांच्या शहीद दिनानिमित्ताने म्हणजेच चतुर्थ पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 15 डिसेंबर 2020 रोजी प्रदिप साहेबराव मांदळे द्रास सेक्टर येथे कार्यरत असताना त्यांना विर मरण आले होते. त्यांच्या आठवणी तर निरंतर चालू राहतील पण त्यांच्या पच्छात आज दिनांक 15 December 2024 रोजी पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित केला होता. सुनंदा मांदळे वीरमाता व कांचन मांदळे वीर पत्नी यांनी पुष्प, धूप, दिप पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात केली. ज्योती मांदळे यांनी शाळेतील मुलींचे नृत्य बसवून आरती मांदळे, प्रीती बागल, नेहा खरात, श्रुती बागल, नंदिनी मांदळे, शिवानी अंभोरे रोजी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. विशेष बाब म्हणून बुलढाणा दक्षिण च्या समता सैनिक दला कडून त्यांना सलामी देण्यात आली.सदरील कार्यक्रमासाठी राजकिय , शिक्षण, पोलीस, इत्यादी विभागातील अधिकारी कर्मचारी सुद्धा हजर होते.आजी-माजी सैनिक यांनी सुद्धा सलामी देऊन सर्व गावकरी मंडळी नातेवाईक यांनी त्यांना सामूहिक श्रध्दांजली अर्पण केली तसेच दादाभाऊ मांदळे, ऋषिकेश मोरे, रामदास खरात , वैभव इंगळे , रोशन सदावरते, निलेश विणकर , गजानन वाघ, विजय साळवे, देविदास मांदळे, विशाल मखर, सुभाष लांडगे, शरद म्हस्के, अजय धोत्रे, आश्विन लहाने, निखिल ससाणे, आकाश साळवे, अरुण मुंढे, विनोद मांदळे, नंदकिशोर शेटे, सुखदेव मांदळे, समाधान मुंढे , अरुण प्रल्हाद मुंढे,भरत चौधरी , रमेश बागल, आदित्य मगर, बाळू अंभोरे, संदीप मांदळे, कुणाल मांदळे , उद्धव राजे जाधव, संतोष मांदळे ,विशाल मांदळे ,समीर साळवे, गजानन देशमुख यादी 33 लोकांनी रक्तदान करून एक प्रकारची देश सेवाच केली. सर्व रक्तदान दात्यांचे शहीद नायक प्रदिप साहेबराव मांदळे फाऊंडेशन पळसखेड चक्का यांच्या कडून आभार मानण्यात आले. कार्यक्रमासाठी झटणारे कुणाल मांदळे, अरविंद मांदळे, सुशील बागल, विजय लिंबोळे, दुंडियार व रुपाली मोरे, लता खरात ,अनिता नितनवरे इत्यादींचे दीपाली संदीप मांदळे यांच्या कडून आभार मानण्यात आले. भविष्यात ही सामाजिक उपक्रम राबवून वीर जवानाची आठवण तेवत ठेवण्याचा निर्धार शहीद नायक प्रदिप साहेबराव मांदळे फाऊंडेशन कडून करण्यात आला.
Offcanvas menu