दुसरंबीड/ प्रतिनिधी पत्रकार,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सानप यांचा आज दि २२ डिसेंबर रोजी ठिक ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला. सामाजिक संघटनेच्या व पत्रकार संघटनेच्या वतीने सिंदखेडराजा मतदार संघात दुसरबीड तढेगाव बीबी भुमराळा किनगाव जट्ट चिखला देऊळगाव कोळ झोटींगा खंडाळा लोणार मांडवा विरपांगरा सह इतर ठिकाणी त्यांच्या चाहत्यांनी व मित्र मंडळींनी त्याचा शाल श्रीफळ देवून हृद्य सत्कार करण्यात आला तद् नंतर बिबी येथील गरजवंत महिलांना वाढदिवसानिमित्त किराणा किट व साडी चोळी चे वाटप देवानंद सानप यांच्या चाहत्यांकडून वाटप करण्यात आले
वयाच्या १५ वर्षापासून सामाजिक कार्यातून राजकारणात आले आणि राजकारणात आल्यानंतर सर्वसामान्यांय विषयी असलेली तळमळ या कार्यातून लोकप्रियता वाढत गेली आणि अंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाभर कार्यकर्ते व मित्र परिवार वाढतच गेला यातून शेतकरी कष्टकरी मजूर अनाथ अपंगांच्या समस्या निवारण्याचे काम करून शासन दरबारी न्याय मिळवून दिला आजही ते कार्य चालू असून भविष्यात गोरगरिबांवरील अन्याय अत्याचाराच्या लढून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य चालूच ठेवणार असे देवानंद सानप यांनी सांगितले
यावेळी पत्रकार भगवान नागरे काशिनाथ राऊत,दिनकर काकड, अशोक मुंडे,मधुकर मोहीते, रमेश खंडागळे ,भागवत आटोळे, रामप्रसाद जाधव ,रोशन चव्हाण, ऋषी दंदाले , कृष्णा पंधे,जहीर भाई,भाजपा युवा ता अध्यक्ष राम डुकरे, ता.सचिव प्रविण धाईत, व्यापारी आघाडी जि. उपाध्यक्ष गोपाल काबरा, वंचित ता. अध्यक्ष दिलीप राठोड,धनंजय कायंदे,सागर मुर्तडकर ,रंजीत सानप , आशिष अग्रवाल ,भागवत मुळे, विशाल मुर्तडकर , ऋषिकेश धाईत, मंगेश बोबडे , बाबू सिंग जोरावर सरपंच गणेश काकड ,शाम इंदोरिया, सुनिल मुंढे, गजानन मुर्तडकर , अमोल गावडे , राहुल वानखेडे, कैलास तांदुळे, प्रसाद कुलकर्णी, रामेश्वर काळुसे, विलास दराडे, गणेश डुकरे, गजानन गायकवाड,
असंख्य चाहते व मित्र मंडळी हजर होती.
———————————–
आमदार मनोज कायंदे, प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, माजी आमदार तोताराम कायदे,भाजपा नेते प्रभाकर ताठे,सह अनेक पक्षातील नेत्यांनी व सामाजिक संघनटनेतील कार्यकर्त्यांनी सानप यांना शुभेच्छा दिल्या