सिंदखेडराजा,(प्रतिनिधी)- दानपरमीता हा बौध्द धर्मात दानपरिमीतेला अन्ययसाधारण महत्व आहे तो विचार घेवून पत्रकार बाबासाहेब जाधव १९८८ पासून आपल्या घरातील सुखदु:खाचे कार्यक्रम दानपरिमितेने साजरा करत असतात ते १९८८ पासून दानपरिमीतेच्या माध्यमातून दर वर्षी एकलाख रूपये धम्मदान करीत आले आहे असेच पूढेही चालू राहील असा त्यांचा संकल्प आहे.
मातृतिर्थ सिंदखेडराजा हे शहर स्वातंत्र्यपूर्व काळापासून शुरविर माताजाजाऊच माहेर राजे लखुजी जाधव यांची कर्मभूमी असलेले व आंबेडकरी चळवळीच विदर्भातील प्रमुख केंद्र
विश्वरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकरांच्या मानव मुक्तीच्या लढ्यामध्ये अग्रगण्य असलेले सिंदखेडराजाचे भूमिपुत्र आंबेडकरी व धम्म चळवळीचे निष्ठावान अनुयायी त्यागमुर्ती नागोराव जाधव गुरूजी यांच कार्य असलेले त्यांच्यासोबत मोठ्या राजवाड्यातील व लहान राजवाड्यातील बौध्द उपासक, उपासिका हे त्याकाळी एकत्र येऊन त्यांनी चळवळीचे,धम्म कार्यासाठी सिंदखेडराजा बसस्थानका समोरील बुध्द विहाराची निर्मिती १९६४ साली केली व या ठिकाणी बौध्द धम्म विधी-पुजापाठ, प्रार्थणा, डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, सामाजिक उन्नतीचे विचार एकत्र येऊन येथे विचार विनिमयाचे कार्य अविरतपणे २००९ पर्यंत सुरू असायचे.हे आपल्या पूर्वजांचे संस्कार रूपी गतवैभव परत प्राप्त करावयाचे या हेतूने सिंदखेडराजा येथील मोठा राजवाडा व लहान राजवाडा येथील सर्व बौध्द उपासक, उपासिका यांनी एकत्र येवून हे बुध्द विहार पुन्हा उभारून धार्मिक विधी व सामाजिक कार्य पुन्हा सुरू करण्यासाठी नवीन बुध्द विहाराची निर्मिती करावयाची हे निश्चीत केले.
ही वास्तू सिंदखेडराजा ऐतिहासिक पर्यटन स्थळी राजे लखुजी जाधव यांच्या कर्मभूमित बुध्द संस्कार केंद्र म्हणून तीर्थस्थळात भर पडावी असे सुशोभित बुध्द विहार उभारावे व एतीहासिक पर्यस्थळात भर पडावी म्हणून ठरल्याप्रमाणे प्रत्यक्ष बुध्द विहार उभारणीचे कामाची सुरूवात ऐतिहासिक बुध्द विहाराचे प्रत्यक्ष काम १४ जूलै २०२४ रोजी सर्वांनी एकमताने सर्वांच्या उपस्थित ३० बाय ३० आकाराची बुध्द विहार भूमीची जागा निश्चित केली आणि नियोजीत बुध्द विहार भूमीचे भूमिपूजन केले.
या भूमिपूजन प्रसंगी प्रा. भगवान शिंदे यांनी पन्नास हजार रूपये व पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी आंबेडकरी चळवळीचे स्मृतीशेष त्यागमुर्ती नागोराव जाधव (गुरूजी) वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एकतीस हजार रूपये व तेथील उपासक उपासिकांनी धम्मदान देऊन बुध्द विहाराच्या बांधकामास सुरवात केली.
आता त्या बुध्द विहाराचे काम बेसमेंट व पील्लर पर्यंत झाले व त्या पील्लरवर डोम टाकण्यासाठी १२ फेब्रुवारी २०२५ या माघ पोर्णिमेच्या शुभदिनी स्मृतीशेष त्यागमुर्ती नागोराव जाधव (गुरूजी) यांच्या स्मृतीपित्यार्थ सामाजीक धार्मीक कामात नेहमी अग्रेसर असलेले दान परिमितेचा वारसा लाभलेले त्यांचे चिरंजीव पत्रकार बाबासाहेब जाधव व सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सुनबाई विमल बाबासाहेब जाधव या उभयतांनी १२ फेब्रुवारी २०२५ रोजी पत्रकार बाबासाहेब जाधव यांचा वाढदिवस दानपरिमिता करून सिंदखेड राजा येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर बुध्द विहारास एक लाख रूपये दिले.
याप्रसंगी नगरसेवक महेश जाधव, मा. प्रशासकीय अधिकारी हरिदासजी सोनोने, सुरेश भाऊराव जाधव, गौतम जाधव,प्राचार्य व्ही.एन. म्हस्के,विनायकराव जाधव व्हीजी अंकल, नारायण म्हस्के, सुभेदार व्दारकीनाथ डिजे म्हस्के, आंबेडकरी चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते तेजराव म्हस्के, विजय भालमोडे, मा.सरपंच गौतम म्हस्के, बाळू म्हस्के, ठेकेदार संदीप जाधव, पाताल प्रभाकरराव म्हस्के, धम्मउपासिका निर्मलाताई तेजराव म्हस्के, अनिल राठोड, सुरेश कोळी, डॅा. भिमराव म्हस्के, आदर्श शिक्षक प्रकाश म्हस्के, बोधाचार्य विनायक काकडे, मगन जाधव, छगन काहाळे, प्रविण उबाळे, उपसरपंच रवि म्हसाजी शिंदे, रविंद्र भिमराव काहाळे, पत्रकार रामदास मानसिंग काहाळे, पत्रकार राहूल झोटे, मधूकर म्हस्के, देविदास जाधव, प्रकाश जाधव इत्यादी बहूसंख्येने उपासक उपासिका उपस्थित होते.