तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार यांचे ओएसडी विवेक मोगल यांनी  कृषी विद्यापीठात कार्यकारी समितीत निवडीसाठी मोठा आर्थिक गैरव्यवहार 

सिंदखेड राजा /रामदास कहाळे तालुक्यातील रहिवाशी असलेल्या विवेक मोगल यांच्या वर  गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते तथा आमदार अमोल मिटकरी  यांनी केला असून त्यांनी म्हटले आहे की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात असलेल्या मंत्र्याच्या ओ एस डी यांनी  केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत मोठा  गैप्यस्फोट केल्याने सिंदखेड राजा मतदार संघात खळबळ उडाली असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी बोलतांना तत्कालीन रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या ओएसडीसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला . 5 कोटींच्या एका कामासाठी आपल्याला भुमरेंच्या खात्यातील एका ओएसडीने पाच लाखांची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप आमदार मिटकरी यांनी केला.

दरम्यान प्रसार माध्यमाशी बोलतांना आमदार अमोल मिटकरी यांनी काही नवे गौप्यस्फोट केले. महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मंत्री असलेल्या संदिपान भुमरे यांच्या सोबतच तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ. तनाजी सावंत, पाटबंधारे मंत्री संजय राठोड आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ओएसडीसंदर्भातही असेच अनुभव आल्याचा दावा त्यांनी केलाय. भुमरे यांच्या संबंधित ओएसडीचं नाव घेणं आमदार अमोल मिटकरी यांनी टाळलंय. त्यामुळेच यातील अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत आज मंत्रिमंडळात नाही.

 

मात्र, तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे ओएसडी असलेले विवेक मोगल यांच्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी काही गंभीर आरोप केलेत. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नेमलेल्या राज्यपाल नियुक्त नावांमध्ये मोगल यांनी आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोप आमदार मिटकरी यांनी केलाय. यात मोगल यांनी विदर्भाच्या विद्यापीठावर विदर्भा बाहेरचे प्रतिनिधी नेमल्याचा आरोप त्यांनी केलाय. याबरोबरच संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे यांच्या खात्यातील ओएसडी आणि इतर लोकांचे अनुभवही चांगले नसल्याचाही त्यांनी पुनरुचार केलाय.

 

दरम्यान, आपल्या मतदारसंघात हजारो कोटींची विकास कामे केल्याचा दावा करणारे आमदारांना हा निधी कसा मिळतो?, हेही एकदा विचारा, असा टोला आमदार मिटकरी यांनी लगावलाय. आमदार मिटकरी यांनी आज परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेचे कौतुक.

अमोल मिटकरी, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *