Aap ‘आप’च्या खासदार स्वाती मालीवाल मारहाणप्रकरणी आज दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Kejriwal यांच्या निवासस्थानाहून त्यांचा माजी स्वीय सहायक बिभव कुमार याला अटक केली. दरम्यान, मारहाणीच्या कथित घटनेनंतर केजरीवाल यांच्या निवासस्थानातून मालीवाल सहजपणे बाहेर पडत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज आज ‘आप’ने जारी केले.
चौकशीत सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शविताना आपण दाखल केलेल्या पोलिस तक्रारीचीही दखल घेण्यात यावी, असे बिभवने अटक होण्यापूर्वी दिल्ली पोलिसांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.मालीवालांना ४ जखमा मालीवाल यांची एम्समध्ये चाचणी केली. न्यायवैद्यकीय अहवालात मालीवाल यांचा उजवा गाल व डाव्या पायासह चार ठिकाणी जखमा असल्याचे नमूद आहे.
ब्लॅकमेलिंगचा आरोप विरोधकांना ब्लॅकमेल करणे ही भाजपची कार्यपद्धती आहे. स्वाती भाजप नेत्यांच्या संपर्कात होत्या. त्यांना ब्लॅकमेल करून भाजपने केजरीवालांविरुद्ध कटाचा चेहरा बनवला, असे आतिशी म्हणाल्या.ब्लॅकमेलिंगचा आरोप विरोधकांना ब्लॅकमेल करणे ही भाजपची कार्यपद्धती आहे. स्वाती भाजप नेत्यांच्या संपर्कात होत्या. त्यांना ब्लॅकमेल करून भाजपने केजरीवालांविरुद्ध कटाचा चेहरा बनवला, असे आतिशी म्हणाल्या.