https://vruttamasternews.com/sambhaji-nagar-news/
संदीप पाटील (पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर) यांचा एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने सत्कार
———————–
छत्रपती संभाजीनगर, ७ जून: शहरात नुकतेच रुजू झालेले पोलीस आयुक्त संदीप पाटील यांची आज एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी शहरातील विविध समस्यांवर चर्चा झाली.शिष्टमंडळाने रहदारीच्या समस्येवर विशेष लक्ष घातले. वाहनचालकांची शिस्त नसल्यामुळे कोणीही कुठेही वाहन उभे करतात, त्यामुळे सर्वांना त्रास होतो. हा प्रश्न लवकरच सोडवावा, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. यावर पोलीस आयुक्त पाटील यांनी सांगितले की, रहदारीचा प्रश्न सोडवण्यासाठी आमचे नियोजन सुरु आहे आणि लवकरच या समस्येचे समाधान केले जाईल.
यावेळी पोलीस आयुक्तांचा संघटनेच्या वतीने गुलाब पुष्प आणि भारताचे संविधान देऊन सत्कार करण्यात आला. “संविधान धोक्यात आहे, त्याची रक्षा करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. पोलीस प्रशासनाने देखील संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी कटीबद्ध रहावे,” असे शिष्टमंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
या भेटीत संघटनेचे अध्यक्ष रतकुमार साळवे (दैनिक, निळे प्रतीक), सचिव संजय सोनखेडे (साप्ताहिक, महासत्य), उपाध्यक्ष मनीष अग्रवाल (संपादक, दैनिक राजनिष्ठा), अविनाश पहाडे (संपादक, श्री पार्श्व संदेश), जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद गवळी (संपादक, धम्मप्रचार), देवीदास आढाव, अण्णासाहेब काळे (साप्ताहिक,क्राईम मॅटर) आदींची उपस्थिती होती.