https://vruttamasternews.com/buldhana-news-25/
देऊळगाव राजा / राजु भालेराव
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मा आमदार डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वर्ग 10 वी 12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तथा शासकीय नोकरीसाठी निवड या विद्यार्थ्यांचा सत्कार तथा अभिनंदन सोहळा समारंभ आज दि 16 जुन 2024 आर्या लाॅनस दे राजा येथे कार्यक्रमांचे सत्कारमूर्ती मा डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब, तसेच मा अॅड नाझेर काझी साहेब ( जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला त्या अनुषंगाने श्री शिवाजी विद्यालय दे मही येथील विद्यार्थ्यांनी कु किरण शिवाजी प-हाड या विद्यार्थ्यांनीने शै सत्र सन 2023-24 मध्ये वर्ग 10 मध्ये 90.60 गुण मिळवुन घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल तीचा उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले त्या प्रसंगी उपस्थित मा आ डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब, मा अॅड नाझेर काझी साहेब, मा डोंगरजाळ मॅडम, तहसिलदार मॅडम दे राजा, श्री राजु भाऊ चित्ते सर, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी शिक्षक संघटना, ठाणेदार महले साहेब, संचालक धुळे साहैब, गटविकास अधिकारी माहुरे साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी कदम मॅडम तथा इतर शासकीय अधिकारी व पदाधिकारी..