https://vruttamasternews.com/buldhana-news-28/
आडगाव राजा ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी शाम काळे यांची बिनविरोध निवड
सिंदखेड राजा/ प्रतिनिधी
आडगाव राजा ग्रामपंचायत चे उपसरपंच सौ कासाबाई मानसिंग कहाळे यांनी ठरल्या प्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्या जागेसाठी आज दिनांक 24/6/2024 रोजी ग्रामपंचायत च्या सरपंच सौ रंजना संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक पार पडली असून या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य श्याम काळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने उपसरपंच म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामसेवक यांनी चंद्रकांत बोरुळ यांनी जाहीर केले यावेळी मावळते उपसरपंच सौ कासाबाई मानसिंग कहाळे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य अशोक कहाळे, पांडुरंग शिंदे, सौ अरुणा निलेश शिनगारे, सौ गंगूबाई रुस्तुमराव झोरे , सौ जनाबाई गैबी राठोड, यांच्या सह गावातील नागरिकांनी नवनिर्वाचित श्याम काळे यांचा सत्कार केला