https://vruttamasternews.com/mumbai-news-2/
सिद्धार्थ खरात यांच्या
प्रशासकीय सेवेला अखेर पूर्णविराम ..!!
मंत्रालयीन कक्ष अधिकारी ते सहसचिव व केंद्रांसह राज्यातील विविध मंत्रीमहोदयांकडे स्विय सहाय्यक (पी.ए.) ते खाजगी सचिव (पी.एस.) अशा विविध पदावर प्रो- ॲक्टीवली , नाविन्यपूर्ण , निष्कलंक व बेदाग अशी ३० वर्षाची सेवा पूर्ण करून दिनांक १ जुलै २०२४ पासून स्वेच्छा सेवानिवृत्ती (VRS ) घेतली आहे..
ताडशिवणी सारख्या दुर्गम खेड्यापासून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्राचे पॅावर हाऊस असलेल्या मंत्रालयापर्यंत जाऊन पोहोचला ..
या कालावधीत सार्वजनिक बांधकाम , ग्राम विकास , आरोग्य , उच्च व तंत्र शिक्षण व गृह ( बंदरे) इत्यादी विभागात अनेक महत्वपूर्ण निर्णय , धोरणे , मंत्रीमंडळ प्रस्ताव , नवीन कायदे , शासन निर्णय , स्टॅचुट्स, आदेश , प्रशासकीय व कायदेविषयक सुधारणा अशा सार्वजनिक हिताच्या एक ना अनेक बाबी करतांना प्रत्यक्ष सहभागी होऊन पुढाकार घेता आला..
नविन कायदे, विधि विद्यापीठे , स्वयं अर्थसहाय्यीत विद्यापीठे निर्माण करत असतांना सुमारे ७०-८० मंत्रीमंडळ प्रस्ताव त्यांच्या हातून सादर करता आले
विविध मंत्रीमहोदयांकडे काम करतांना सामान्य नागरिकांच्या प्रती काम करतांना मोलाचा अनुभव मिळाला ..
या संपूर्ण कालावधीत वेळेवेळी मार्गदर्शन करणारे , वरिष्ठ , सहकारी , मित्र परिवार व कुटुंबियांचा भक्कम पाठींबा व समर्थ साथ यामुळेच हे शक्य झाले.
त्यामुळेच पुन्हा पुन्हा आपल्या मातीकडे व माणसांकडे पाय वळत राहीले..
दुष्काळग्रस्त होते कणसात चार दाणे
पक्षी मला उपाशी हुसकावता न आले
अवघीच जिंदगी मग झाड होत गेली
मातीत पाय रूतले ते काढता न आले .!!!