https://vruttamasternews.com/buldhana-news-475-2/
निमगाव वायळ येथील नदीपात्रातून औवध उत्खनन करणारे रस्ते जे सी बी च्या सहायाने तोडले
आतापर्यन्त नंदीपत्रात जाणारे रस्ते सहा वेळा तोडण्यात आल्याने अवैध रेती वाहतुक किती दिवस बंद राहणार याकडे गामस्थांचे लक्ष?
सिंदखेडराजा/आनिल दराडे
सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायळ येथे मोठ्या प्रमाणात औवध उत्खनन सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन होत असल्याने येथील कोल्हापूरी बंधारा धोक्यात आला होता या अवैध रेती उत्खननाच्या तक्रारी उपविभागीय अधिकारी यांच्यांको आल्याने उपविभागीय अधीकारी प्रा संजय खडसे यांच्या आदेशान्वये प्रभारी तहसिलदार प्रविण धानोरकर, तालठी राहुल देशमुख, कोतवाल आकाश मघाडे यांच्या उपस्थितीत तारीख 8 जुलै रोजी सांयकाळी जे सी बी च्या सहयाने सदर ठिकाणचे रस्ते तोडण्यात आले आहे
आतापर्यत येथील खडकपूर्णा नदीपात्रात जाणारे रस्ते सहा वेळा तोडण्यात आले असून आता किती दिवस रेती उत्खनन व वाहतुक बंद राहणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे या खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन व वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण करून मोठ्या प्रमाणात ह्या रेतीचा साठा निमगांव वायाळ परीसरात टाकण्यात आला आहे मात्र या रेती साठ्यावर जप्तीची कारवाई करण्यास महसुल विभाग टाळाटाळ करीत असल्याने महसुल विभागावर सामान्य जनतेच्या मनात नाराजीचा सुर उमटत आहे निमगांव वायाळ येथून होणाऱ्या अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यंथील रस्ते तोडण्याच्या सुचनेवरून प्रभारी तहसिलदार प्रविण धानोरकर यांच्या उपस्थितीत तलाठी राहुल देशमुख कोतवाल आकाश मघाडे यांनी नंदीपत्रात जाणारा रस्ता जेसीबी च्या साहयाने तोडण्यात आले असून निमगोव वायाळ येथील अवैध उत्खनन होणार नसल्याची माहिती तहासिलदार प्रविण धानोरकर यांनी बोलतांना दिली आहे
—————————————-
निमगांव वायाळ येथील खडकपूर्णा नदीपात्रातून होणारी अवैध रेती उत्खनन रोखण्यासाठी तहसिलदार प्रविण धानोरकर यांनी निमगांव वायाळ येथे २४ तास बैठे पथक नियूक्त केले असून या बैठे पथकाच्या काळात अवैध रेती उखनन झाल्यास या पथकावर व नियत्रण अधीकार्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती तहसिलदार यांनी दिली आहे