Buldhana news शेतकऱ्याचे पिक नुसकानीचे पंचनामे कोरे देवून पैस्याचीलूट वनरक्षक बिल्लारीचा प्रताप

Buldhana news https://vruttamasternews.com/buldhana-news-2/

शेतकऱ्याचे पिक नुसकानीचे पंचनामे कोरे देवून पैस्याचीलूट वनरक्षक बिल्लारीचा प्रताप

देऊळगांव मही ता .१७  बिट मध्ये वनक्षेत्र सातशे हेक्टर वनक्षेत्र असुन या जंगलात रोही ( निलगाय);रानडुक्कर , हरिण, काळविट ,लांडगे, कोल्हे, माकड, मोर अदी वन्यप्राण्याचे अस्तीत्व मोठया प्रमाणात आहे . ते प्राणी शेतकऱ्याच्या शेतातील पिकाची दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुस्कान करतात आणि पिके उद्धवस्त होवुन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो . याबाबीचा सरकार विचार करून वन्यप्राणी कायदाचा वापर करून झालेले शेतकयाचे होणारे नुस्काण टाळण्यासाठी तारेचे कुंपन अदी योजना या विभागाकडून राबिविल्या जाते . आणि शेतकऱ्याच्या पिकाची नुस्काण भरपाई वन विभागाच्या वतीने पिकाची पाहणी करून दिली जाते मात्र वनविभाचे वनरक्षकामार्फत ही कारवाई केल्या जाते .

वनविभागाचे अंढेरा बिटचे श्री . जिवन बिल्लारी हे शेतकऱ्याकडून झालेल्या वन्यप्राण्याकडुन पिकाचे नुस्कान घटणास्थळ पंचनामे करण्यासाठी किमान एक तर तिन हजार रुपये घेतले जातात अशी एका शेतकऱ्याने नावन सांगण्याच्या अटीवर ही बाब सांगुन कोरे पंचणामे देवुन शेतकऱ्यांची लुट चालविली आहे . याकडे वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी का लक्ष देत नाही हा प्रश्न शेतकऱ्यांनी निर्माण केला आहे .

या भागातील वन्यप्राण्यानी केलेल्या नुस्काणभरपाईसाठी धोत्रांनदंई , अंढेरा , शिवणी आरमाळ , मेंडगांव, बायगाव , पिंप्री आंधळे , वाकी खुर्द , वाकी बुद्रुक,देऊळगांव मही अदी भागातील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे अर्ज केले होते

वनरक्षकावर कारवाई होवुन तात्काळ शेतकऱ्यांना पुर्ण शेतमालाचे नुकसान भरपाई मिळावी आणि कोरे पंचनामे देवुन शेतकऱ्याकडुन पैसे घेत किती नुकसान झाले हे प्रत्यक्ष पाहणीत करणे अपेक्षीत असताना उपकार केल्याची भावना शेतकऱ्यांना दाखविणाऱ्या मुजोर वनरक्षक कारवाई होणे अपेक्षीत आहे . अन्यथा याबद्दल मोठे आंदोलन करून शेतकऱ्यानां न्याय देवु .रविकांत तुपकर शेतकरी नेते

 

 

आमच्या शेतात येवुन पिकाची प्रत्यक्ष पाहणी न करता वनरक्षक यांनी आमच्या पिकाचे किती टक्के नुसकाण दाखविले नसल्याने आम्ही अडचणीत आलो आहे . घटणास्थळ पंचनामे कोरे दिले होते .

भानुदास कनखर

अनिल काळुसे( पिडीत शेतकरी मेंडगांव)

शेतकऱ्याकडून पैसे घेवुन घटणास्थळ पंचनामे करून देणाऱ्या अंढेरा बटच्या वनरक्षकाची चौकशी करून दोषी असल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल .

विपुल राठोड  प्रभारी जिल्हा मुख्यवनरक्षक बुलडाणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *