https://vruttamasternews.com/buldhana-news-47/
महसूल कर्मचारी यांच्या संपामुळे जनतेची कामे रखडली — काँग्रेस नेत्या ऍड.जयश्री शेळके यांची विरोधी पक्षनेते विजय वड्डेटिवार यांच्या कडे केली मागणी
बुलडाणा/ प्रतिनिधी
राज्य महसूल कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रिया, शालेय शिष्यवृत्ती अशा विविध कामांसाठी जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला तसेच इतर महसूली कागदपत्रांची आवश्यकता असते. कामबंद आंदोलनामुळे सेतू कार्यालयातून आलेले दाखले सह्यांसाठी पडून आहेत. त्यामुळे विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांना काम पूर्ण होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास लक्षात घेता शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव ॲड. जयश्रीताई शेळके यांनी काल विरोधी पक्षनेते मा.विजयजी वडेट्टीवार तसेच गटनेते मा. बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.