Buldhana news जिल्हा परिषद यंत्रणेचा गचाळ कारभार.. शिक्षक कर्मचारी नऊ महिन्यापासून पगारापासून वंचित.. तत्काळ उपाययोजना न केल्यास भीम आर्मीचा आक्रमक आंदोलनाचा इशारा.

https://vruttamasternews.com/buldhana-news-48/

जिल्हा परिषद यंत्रणेचा गचाळ कारभार.. शिक्षक कर्मचारी नऊ महिन्यापासून पगारापासून वंचित..

तत्काळ उपाययोजना न केल्यास भीम आर्मीचा आक्रमक आंदोलनाचा इशारा.

 

बुलढाणा/ प्रतिनिधी

जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक पदावर कार्यरत असलेला शिक्षक गेल्या नऊ महिन्यापासून वेतनापासून वंचित आहे. सदर शिक्षकावर नऊ महिन्यापूर्वी काही कायदेशीर कारवाईमुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. निलंबन कार्य काळामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचा निर्वाह भत्ता देणे गरजेचे व न्याय आहे. असे असताना सदर शिक्षकाला नऊ महिन्यापासून पगाराच्या स्वरूपात एक रुपया सुद्धा देण्यात आला नाही यामुळे सदर शिक्षकाच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. निर्वाह भत्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणाचाही अडवता येत नाही असे असताना हेतू पुरस्कार जिल्हा परिषद चे काही अधिकारी व कर्मचारी सदर शिक्षकाला केवळ त्रास देण्याच्या हेतूने कर्तव्यामध्ये कसूर करत आहेत असा संशय कुटुंबीयांकडून व्यक्त केल्या जात आहे. आपल्या कर्मचाऱ्याला सांभाळून घेणे व त्याला योग्य न्याय देणे ही वरिष्ठ अधिकाऱ्याची जबाबदारी असताना याबाबत मात्र वरिष्ठ अधिकारीच हेतू पुरस्सर टाळाटाळ करीत आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वी असाच प्रकार रायपूर येथील आरोग्य सेवकाच्या बाबतीत देखील झाला होता व त्याचा संताप म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांच्या पत्नीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये स्वतःला ब्लेड मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तोही प्रश्न भीम आर्मी यशस्वी मध्यस्थी करून सोडवला यानंतरही सुचवलेली मुजोर अधिकारी सुधारले नाहीत व मोरे नामक शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयावर एक प्रकारे अन्याय करीत आहेत.पुढील कार्यालयीन तीन दिवसांमध्ये सदर शिक्षकाचे निर्वाह भत्ता व वाढीव पेमेंट सबंधित शिक्षकांच्या खात्यामध्ये जमा न केल्यास भीम आर्मी आक्रमक स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *