https://vruttamasternews.com/akola-news-554-2/
अकोला जिल्ह्यातील
आपातापा येथे गर्भवती महिलेला चिखलातुन जाताना झोळीत टाकुन रस्ता केला पार
आपातापा येथील घटना
खराब रस्तामुळे गर्भवती चा पाय घसरल्याने प्रसूती दरम्यान बाळाचा मुत्यू
अकोला /प्रतिनिधी
महाराष्ट्र भर लाडक्या बहिणी साठी 1500 रू अनुदान देण्याची योजना आणि त्या साठी अर्ज भरण्यासाठी लाडक्या बहिणी ची गर्दी सुरू असतानाच मात्र अकोला जिह्यातील आपा तापा गावात रस्ता नसल्याने चिखल तुडवत रस्त्याने जाताना गरोदर महिला पडून त्या महिलेला शेजारील महिलांनी झोळीत टाकून दवाखान्यात नेले असता प्रसूती दरम्यान सदर महिलेच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना 20 जुलै रोजी घडली आहे
आपातापा येथील महिलेला प्रसुतीच्या काळा सुरु झाल्याने जिल्हा रुग्णालयात भरती होण्यासाठी घरुन निघालेल्या गर्भवती महीलेचा चिखल असलेल्या खराब रस्त्यावर पाय घसरून चिखलात पडली तेव्हा तिने एखच टाहो फोडला. महिलेचा आवाज ऐकुन शेजारच्या महिलानी धाव घेत तिला साडीच्या झोळी मध्ये टाकुन गावातील मुख्य रस्ता पर्यंत आणले हा धक्का दायक प्रकार शनिवारी आपातापा या गावात घडला दरम्यान गर्भवती महिलेची प्रसुती झाली मात्र मृत बालक जन्माला आले 20 जुलै रोजी शीतल राजकुमार कासदे वय27 या गर्भवती महिलेला प्रसुतीच्या कळा सुरु झाल्या मात्र घरी कोणीच नसल्यामुळे ही महीला घरुन दवाखान्या मध्ये एकटी जाण्यासाठी निघाली यावेळी चिखलामध्ये पाय घसरून ही गर्भवती महिला पडली त्यावेळी शेजारच्या महिलानी धाव घेत साड़ी ची झोळी करुण त्यामध्ये तिला टाकले व रत्या पर्यंत झोळीमधुन नेले यआनंतर महिलेला सर्वपचार रुग्णालयात पाठविले या ठिकानी तिची प्रसुती झाली व बाळ दगावल्याची माहिती मिऴाली एव्हढी गंभीर परीस्थिती असताना सुध्दा संबंधित प्रशासनाला जाग येत नसल्याने ग्रामस्था कडुन रोष व्यक्त होत आहे