महसूल विभागाच्या आशिर्वादाने अवैध रेती वाहतूकीला कंटाळून महीला सरपंचाने दिला आत्मदहनाचा इशारा
https://vruttamasternews.com/https-vruttamasternews-com-60-2/
सिंदखेडराजा /प्रतिनिधी
सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथील खडकपूर्णा नदीपात्रातून लाखो ब्रास वाळू चे उत्खनन दिवसरात्र जेसीबी ने महसूल विभागाच्या आशिर्वादाने सुरू असून सदर रेती घाटाचे तांत्रीक मोजमाप व सीसीटीव्ही फुटेज मिळण्यासाठी वारंवार अर्ज निवेदन देऊन ही महसूल विभागाने लोकप्रतिनिधी ची दिशाभूल केली असल्याचे शेवटी निमगाव वायाळ येथील महीला सरपंच सौ शिला चाटे यांनी सात दिवसांत निमगाव वायाळ येथील रेती घाटाचे तांत्रीक मोजमाप करून दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अन्यथा कारवाई न झाल्यास २७ मे रोजी निमगाव वायाळ येथील रेतीघाटात आत्मदहन करण्याचा इशारा तारीख २१ मे रोजी दिलेल्या निवेदनात दिला आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की निमगाव वायाळ येथील खडकपूर्णा नदीपात्रातून शासकीय लिलाव झाला असून सदर लिलाव क्षेत्रात लाखो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन झाले असून सदर रेती घाटाचे तांत्रीक मोजमाप करून दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी यासाठी निमगाव वायाळ येथील महीला सरपंचाने वारंवार तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन निमगाव वायाळ येथील शासकीय लिलाव क्षेत्रामधील अवैध उत्खनन याचे मोजमाप करून तसेच सदर रेती घाटातील सीसीटीव्ही फुटेज ची मागणी केली होती मात्र सदर महसूल विभागाने लोकप्रतिनिधी ची दिशाभूल केली असून अद्याप या रेती घाटाचे तांत्रीक मोजमाप केले नाही व अद्याप या घाटातील सीसीटीव्ही फुटेज ही देण्यात आले नाही सदर रेती घाटातील शासकीय ठेकेदाराने तीन हजार सातशे ब्रास उत्खनन केल्याचा अहवाल तहसिल कार्यालयात सादर केला आहे मात्र या रेती घाटाचे मोजमाप केल्यास पाच ते सहा लाख ब्रास चे आज रोजी उत्खनन झाल्याचे दिसून येत आहे वरील उत्खनन हे महसूल कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाने झाले असून सदर रेती घाटाचे तांत्रीक मोजमाप झाल्यास यात महसूल विभागाचे अनेक अधिकारी गोत्यात येणार असल्याने सदर घाटाचे तांत्रीक मोजमाप करण्यात आले नाही असे एका वरिष्ठ अधिकारी सांगितले आहे सदर रेती घाटातील अवैध रेती उत्खनन याचे मोजमाप करून या घाटातील सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावे व अवैध रेती उत्खनन प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी यासाठी येथील महिला सरपंच यांनी तहसिलदार यांना निवेदन देऊन केली आहे तसेच सदर रेती घाटातील सात दिवसांत कारवाई झाली नसल्यास याच रेती घाटात आत्मदहन करण्याचा इशारा दिला असून या आत्मदहनास महसूल विभाग जबाबदार राहील असे निवेदनात शेवटी म्हटलं आहे
—————————————-
निमगाव वायाळ येथील येथील शासकीय रेती घाट क्षेत्रात दिवसरात्र जेसीबी ने उत्खनन सुरू आहे याबाबत महसूल विभागाला याबाबत माहिती देऊन ही महसूल विभागाने कर्मचारी फक्त या घाटात येऊन अर्थ पुर्ण व्यवहार करून निघून जातात मात्र कारवाई करीत नसल्याने या रेती तस्कराने मुजोरी वाढली असून महसूल विभागाच्या आशिर्वादाने माझ्या जिवाला व कुटुंबाला धोका निर्माण झाला असून माझ्या कुटुंबावर कुठल्याही वेळी हल्ला होऊ शकतो जर माझ्या जिवाला व कुटुंबालाही काही धोका झाल्यास याला रेती तस्कर व महसूल विभागातील कर्मचारी जबाबदार धरावे अशी माहिती दैनिकाशी बोलतांना महीला सरपंच शिला रामेश्वर चाटे यांनी दिली
सदर रेती घाटाचे मोजमाप करण्यासाठी तत्कालीन लाचखोर तहसिलदार सचिन जैस्वाल यांनी भूमी अभिलेख कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना मोजमाप करण्याचे पत्र २ मार्च रोजी दिले होते मात्र या कारवाईत आपण गोत्यात येणार असल्याने मात्र सदर पत्राचा पाठपुरावा केला नसल्याने सदर घाटाचे मोजमाप झाले नाही
निमगाव वायाळ येथील खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध उत्खनन झालेल्या ठिकाणचे मोजमाप झाल्यास शासकीय लिलावधारक व अनेक महसूल कर्मचारी यांच्यावर कारवाई होणार आहे त्यामुळे सदर घाटाचे मोजमाप करण्यासाठी फक्त पत्रव्यवहार केला जाणार आहे मात्र मोजमाप होणार नाही यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी चंग बांधला आहे अशी माहिती एका राजकीय कार्यकर्ते यांनी दिली आहे