https://vruttamasternews.com/mumbai-news-6/
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचा आरक्षण बचाव यात्रेला जाहीर पाठिंबा…
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आज चैत्यभूमी येथून आरक्षण बचाव यात्रेस सुरुवात झाली.
त्यांनी केलेल्या आवाहनानुसार अनेक ओबीसी संघटनांनी आरक्षण बचाव यात्रेला पाठिंबा दर्शविला आहे. त्याअनुषंगाने ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे अध्यक्ष मा. सुनील शेळके यांनी संघटनेच्यावतीने आरक्षण बचाव यात्रेला चैत्यभूमी येथे भेट देऊन पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी संघटनेचे महासचिव मा. राम वाडीभष्मे, मुंबई विभागीय अध्यक्ष मा. महादेव मिरगे, मा. महेश राऊत उपस्थित होते