Pandharpur news पंढरपुरात 18 लाख वारकरी, विठ्ठल मंदिरातील दानपेटीत जमा झाला कोट्यवधींचा निधी

https://vruttamasternews.com/pandharpur-news/

पंढरपुरात 18 लाख वारकरी, विठ्ठल मंदिरातील दानपेटीत जमा झाला कोट्यवधींचा निधी

 

२७ जुलै

मुंबई/प्रतिनिधी

यंदा आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एस.टी.ने पंढरपुरात दाखल झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी.महामंडळातर्फे 15 जुलै ते 21 जुलै दरम्यान सुमारे 5 हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. या 5 हजार बसेसव्दारे 19 हजार 186 फेऱ्यांमधून 09 लाख 53 हजार भाविक-प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून, यातून 28 कोटी 92 लाखांचे रुपये उत्पन्न एसटीला मिळाले आहे. तर, यंदाच्या विक्रमी आषाढी यात्रेत विठूरायाची तिजोरी भरली असून मंदिराच्या खजिन्यात तब्बल 8 कोटी 34 लाख रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2 कोटी रुपये जास्त जमा झाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. यावर्षी आषाढीला १८ ते २० लाख भाविक आले होते.

 

यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाडयांचे नियोजन करण्यात आले होते. 5 हजार बसेस वारकऱ्यांच्या प्रवासासाठी एसटीने पंढरपूर येथील वेगवेगळया ४ तात्पुरत्या बसस्थानकांवर तैनात केल्या होत्या. त्याबरोबरच थेट पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष गाडया सोडल्या होत्या. यात्रेच्या आधी दोन दिवस वाखरी येथे झालेल्या रिंगण सोहळयासाठी एसटीकडून 200 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तर, पायी व विविध वाहनांतून यंदा आषाढीला 18 ते 20 लाख भाविक आल्याने पंढरपूर ओव्हरपॅक झाले होते. सर्व ठिकाणी झालेला समाधानकारक पाऊस , ठिकठिकाणी उरकलेलं शेतीची कामे यामुळे यंदा खूप मोठ्या संख्येने भाविक आषाढीसाठी आले होते. याचाच परिणाम म्हणून देवाच्या तिजोरीत गेल्यावेळी पेक्षा 2 कोटी रुपये जास्त जमा झाले आहेत. झाली. दरम्यान, आषाढीच्या दिवशी मुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची शासकीय महापूजा झाली. या यात्रेचा कालावधी दिनांक 6 ते 21 जुलै असा होता. यात्रेमध्ये मंदिर समितीला 8 कोटी 34 लाखाचे उत्पन्न मिळाल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *