https://vruttamasternews.com/buldhana-news-60/
आता आश्वासन नको मदत द्या नाहीतर बळीवंश’ व शेतकरी , करणार 15 ऑगस्ट ला गावोगावी आत्मक्लेश आणि सिंदखेडराजा ला जलसमाधी
बालाजी सोसे, गजानन जायभाये सह अनेक सहकारी घेणार सामूहिक जलसमाधी
पीकविम्या सह इतर मागण्या ही समाविष्ट
सिंदखेड राजा/प्रतिनिधी
सि राजा व देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी मागील अनेक वर्षांपासून खूप त्रस्त आहोत. स्थानिक प्रशासनाच्या कानावर आम्ही आमच्या खालील समस्या अनेक वेळा टाकल्या परंतु आमच्या मागण्यांना सदैव कराची टोपलीच दाखवण्यात आली आणि काहीतरी थातूरमातुर गोष्टीचे मलमपतट्टी करून आमची बोलवण करण्यात येते.
उदाहरण द्यायचे झाल्यास मागील नोव्हेंबर 2023 ला आमच्या परिसरात प्रचंड गारपीट झाली व होत्याचे नव्हते झाले. त्यावेळी झाडून पुसून सर्वच नेते बांदावर आले सत्तेमधली पण आणि विरोधक पण आणि प्रशासनाने पंचनामे करून खरोखर नुकसान आहे असा अहवाल देऊन गेल्या पण पळसखेड चक्का येथे शंभर टक्के नुकसान होऊन सुद्धा तेथे 79 टक्केच नुकसान दाखवली या गावावर खरोखर अन्याय झाला म्हणून मार्च 2024 ला तटपुंजी का होईना पण शासकीय मदत मिळाली, परंतु जर प्रशासन त्यांच्या अहवालात नुकसान दाखवून सरसगट मदत देत असेल मग शेतकऱ्यांचा हक्काचा पीकविमा का नकाराला जात आहे? मागील खरीप हंगामात सुमारे 81074 व रब्बी हंगामात 52124 शेतकऱ्यांनी विमा भरला होता आणि गारपीट झाली त्यावेळी खरीप आणि रब्बी ही दोन्ही पिके शेतात होती. त्यावेळी बहुसंख्य शेतकऱ्यांनी तक्रारी सुद्धा केल्या परंतु कंपनीने तांत्रिक करणे देत कोणतेही पंचनामे न करता तक्रारी अमान्य केल्या. 5000 ते 6000 पंचनामे कंपनी कडून करण्यात आले.
आता पण कंपनी दिशाभूल करत थोड्या फार शेतकऱ्यांना विमा वाटप करुन बोळवन करत आहे. आम्ही सर्व जण हा विमा प्रशासनाने त्यांच्या अहवालात नुकसान दाखवल्या प्रमाणे सरसगट देण्यात यावा यासाठी गेले सात ते आठ महिन्यांपासून लढत आहोत. परंतु आंमच्या पदरी काहीही पडताना दिसून येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा कुणी वाली आहे का नाही असं वाटायला लागलं आहे.
मागील गेल्या सात महिन्यांपासून नुकसान भरपाई पोटी हक्काचा पीकविमा मिळवून घेण्यासाठी सुरु असलेला शेतकऱ्यांचा लढा प्रशासन व पीकविमा कंपनी च्या गलथान कारभारामुळे अजूनही प्रलंबित आहे. सद्या सुरु असलेलं पिकवीमा वाटप हे रब्बीच असून तेही तटपून्ज असून फक्त 11 कोटी रुपयांची मलमपट्टी आहे, प्रत्यक्षात मागणी खरीप 2023-24 ची असताना रब्बीचा पीकविमा देऊन कंपनी शेतकऱ्यांची आणि प्रशासनाची फसवणूक करत असल्याच दिसून येत आहे.
पीकविम्यासह इतराही महत्वाच्या मागण्या
(१ ) खरीप व रब्बी पिक विमा द्या
(२ )सिंदखेडराजा तालुका व देऊळगाव तालुक्यातील प्रलंबित क्षेत्ररस्ते आराखडा मंजूर करा
(३ )शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा
(४ )सिंदखेडराजा तालुका व देऊळगावराजा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांकडे बागायती क्षेत्राचे निकष आहे त्या शेतकऱ्यांचे सातबारा नोंद करा
(५ ) पळसखेड चक्का तालुका सिंदखेड राजा येथील शेतकऱ्यांना बागायती क्षेत्राचा मोबदला मिळाला तेथील शेतकऱ्यांच्या सातबारावर सध्या जिरायती आहे सातबारा असून ते बागायती क्षेत्रात करण्यात यावी
(6) वन्य प्राण्यापासून होणाऱ्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान याची नुकसान भरपाई प्रति हेक्टर पन्नास रुपये द्या नाहीतर शासन स्तरावर वन्य प्राण्याचा विल्हेवाट लावा
10 डिसेंबर 2023 रोजी या काळात श्री बालाजी सोसे यांनी व गजानन जायभाये यांनी तेरा दिवस अन्नत्याग आमरण पोषण केले त्या उपोषणामधील मागण्या १७ होत्या त्यांचे उपोषण सोडते वेळेस मतदार संघाचे आमदार डॉ राजेंद्र जी शिंगणे साहेब जिल्हा कृषी अध्यक्ष आणि उपविभागीय व तहसीलदार अधिकारी यांनी दिलेले लेखी आश्वासन व तोंडी आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे शेतकरी व्यथित झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर वरील सर्व मागण्या 14 ऑगस्टपर्यंत मंजूर किंवा मान्य न झाल्यास आंदोलन हे प्रत्येक गावात आत्मक्लेष आंदोलन होणारच आणि सिंदखेडराजा परिसरामध्ये जलसंमाधी आंदोलन होणारच असल्याची घोषणा या ठिकाणी बळीवंश संघटनेचे श्री नितीन कायदे बालाजी सोसे, सिद्धेधर आंधळे, कैलास मेहत्रे दिलीप चौधरी, बाळू शेवाळे,भगवान पालवे, गजानन चव्हाण, गजानन जायभाये,नागेश मुंढे, समाधान घुगे, उद्धव काकडे, महादेव बुधवत यांच्यासह अनेक शेतकर्यांनी त्या ठिकाणी केली.
काल सिंदखेड राजा येथे निवासी नायब तहसील दार अस्मा मुजावर यांना बळीवंश लोकचळवळीच्या वतीने सदर आंदोलनाचे निवेदन देण्यात यावेळी देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या घोषणा बाजीने परिसर दुमधुमून निघाला होता.
सामूहिक आत्मक्लेश
अनेक महिन्यांपासून बळीवंश या प्रश्नांचा पाठपुरावा गल्ली पासून दिल्ली पर्यंत करत आहे परंतु कुणीच या प्रश्नाकडे गंभीर्याने बघत नसल्याचे दिसून आल्याने येत्या स्वातंत्र्य दिनी दे राजा व सिंदखेड राजा तालुक्यातील गावोगावी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून शासनाचे लक्ष वेधणार आहे.
आत्मक्लेश आंदोलनाला सामूहिक जलसंमाधी ची जोड
सदर प्रश्नांसाठी अनेक वेळा आंदोलन केलेले बळीवंश चे सभासद श्री बालाजी सोसे, श्री गजानन जायभाये यांच्या सह अनेक सहकारी स्वतंत्र दिनी सिंदखेड राजा येथे सामूहिक जलसमाधी आंदोलन करून शासनाचा व पीकविमा कंपनी चा निषेध करणार आहेत.
आंदोलनात 100 गावे सहभागी होतील-नितीन कायंदे यांनी सांगितले आहे