https://vruttamasternews.com/buldhana-news-69/
मेरा बुद्रुक येथील तरूणपणात मुलाच्या आत्महत्येने आई-वडील हतबल!
व्यसनाधीन झालेल्या तरुणांना समजून सांगण्याचे धाडस कोण करणार!
राजकीय नेते फक्त स्मशानभूमीमध्ये भावपूर्ण श्रद्धांजलीच्या भाषणापुरतेच !
कैलास आंधळे/मेरा बुद्रुक
सध्या तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जाऊन भरकटत चालला आहे.त्यामुळे सर्व आई-वडिलाकरता व समाजाकरिता ही बाब चिंतेची असून ज्या मुलांना आई-वडिलांनी लहानपणापासून आपल्या मुलाकडे लक्ष देण्याची सुद्धा गरज निर्माण झाली आहे आज रोजी प्रत्येक गावामध्ये २० ते ३० वयोगटातील नवतरुण व्यसनाच्या आहारी गेली आहे. आपल्या डोळ्यात देखत ज्याला आपण लहान चे मोठे केले शिक्षण दिले तोच तरुण व्यसनाधीन होऊन आपला जीव गमावत असताना आई-वडिलांना किती दुःख होत असेल याची कल्पना न केलेली बरी,मेरा बुद्रुक येथील पंधरा दिवसांमध्येदोन ते तिन तरुण व्यसनाधीन होऊन मृत्युमुखी पडले आहे,या तरुणांचे लग्न सुद्धा झालेले नव्हते.ज्या तरुणांनी आई-वडिलांना म्हातारपणामध्ये सांभाळ केला पाहिजे तेच तरुण आज व्यसनाच्या आहारी जाऊन मृत्यूच्या धाडे मध्ये जात आहे आपल्या डोळ्या देखत तरुण मुलाचा मृत्यू बघून आई-वडिलांना तीव्र वेदना होत असतीलच याची जाणीव व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना व्हायला हवी त्यामुळे आपल्या डोळ्यात देखत आपल्याच मुलाला खांदा देण्याची वेळ आई-वडिलावर तरुणांनी येऊ देऊ नये एवढीच अपेक्षा मेरा बुद्रुक मधील सर्व आई-वडील करीत आहे.सध्या मेरा बुद्रुक मध्ये तीस वर्षाच्या आतील नवतरुण आत्महत्या करत असल्याने अनेक आई-वडील हातबल झाल्याचे दिसून येत आहे. नैराश्य,व्यसन या कारणामुळे तीस वर्षाच्या आतील तरुण मुले आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे.मेरा बुद्रुक मध्ये सध्या स्थिती पाहता वरली मटका व देशी दारूच्या आहारी गेलेले आणि तरुण असून, वरली मटका खेळण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या घरातील पीठ सुद्धा विकल्याचे समोर आल्या आहे.वरली,दारू पिण्यासाठी अनेक नवतरुण आपल्या घरातील दाळ,पीठ विकण्याचे धाडस करत असून आई-वडील मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवत असतानाच आपला मुलगा एवढा व्यसनाधीन किंवा देशी दारू वरली च्या अधीन झाल्याने आई-वडिल हातबल होत असताना दिसून येत आहे. व्यसनाधीन एखाद्याचा मृत्यू झाल्यास समशानभूमीमध्ये अनेक नेतेमंडळी दहा दहा मिनिटांचे भावपूर्ण श्रद्धांजली वर भाषण ठोकतात पण ह्या नवतरुणांना समजून सांगण्याचे धाडस कोणी करत नसल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.ह्या व्यसनाधीन झालेल्या किंवा वरली मटका खेळत असलेले तरूण घरातील दाळ,पीठ विकून वरली आणि देशी दारू पिऊन आई-वडिलांना मारहाण करण्याचे अनेक प्रकरणे समोर येत आहे.