देऊळगावराजा/ देवानंद झोटे अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन व फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी बुलडाणा येथील विशेष सत्र न्यायालयाने उंबरखेड (तालुका देऊळगावराजा) येथील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार दिनांक ०४ मार्च २०१९ रोजी पोलिस स्टेशन देउळगावराजा येथे आरोपी नामे मनोज उत्तम डोंगरे (वय २३ वर्ष) रा. उंबरखेड ता. देउळगावराजा याने पिडीता हीचा पाठलाग करून व फुस लावून पळवून नेले अशा तक्रारीवरुन आरोपीविरुध्द अपराध क्रमांक ५७/२०१९ कलम ३६३, ३५४ (ड) भा.दं. वि. सह कलम १२. बाल लैंगिक अत्याचार अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये भारतीय दंड संहिता कलम ३७६ (अ), ३६६ तसेच बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलम ४,८ प्रमाणे वाढ करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि उमेश भोसले व सपोनि
प्रमोद भातनाते यांनी पुर्ण करून आरोपीविरुध्द विद्यमान विशेष जिल्हा सत्र न्यायालय, बुलडाणा येथे दोषारोपपत्र दाखल केले होते.
दरम्यान विद्यमान विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने एकूण १० साक्षीदार तपासले.त्यामध्ये आरोपीविरुध्द कलम ३६३, ३६६, ३५४(ड), ३७६ (अ) भा.दं.वि.सह कलम ४,८,१२, बाल लैंगिक अधिनियमप्रमाणे सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने न्यायाधीश आर.एन.मेहरे, जिल्हा विशेष सत्र न्यायालय बुलडाणा यांनी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास व ७ हजार रु. दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता व्हि.एल. भटकर यांनी तर सेशन कोर्ट पैरवी म्हणून पोहेकाँ सुनील साळवे ब.नं. १३१९ यांनी देऊळगावराजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहीले.