खडकपूर्णा धरणातील 19 दरवाजेद्वारे खडकपूर्णा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग नागरीकांना सतर्कतेचा इशारा

बुलढाणा /सचिन खंडारे खडकपुर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे खडकपूर्णा नदी व उपनद्या पूर्ण प्रवाहने वाहत आहे. खडकपूर्णा पाणलोट क्षेत्रातून येणारा येवा व पाणलोट क्षेत्रातील होणाऱ्या पर्जन्यमानानुसार धरण परीचलन सूची अंतर्गत पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता यापुढे कधीही धरणाचे वक्राकार दरवाजे उघडून पाणी सोडण्याची गरज पडणार आहे. करिता खडकपूर्णा नदी काठच्या गावांतील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केलें आहे.

आज दि. 3-9-2024 रोजी सकाळी. 5.00 वाजता. खड़कपूर्णा प्रकल्पाचे 19.द्वार हे 0.30 मीटरने उघडण्यात आले आहे.
सद्यस्थितीत प्रकल्पाचे 19 द्वार हे 0.30 मीटरने चालू असून एकूण= 250.25. क्यूसेक्स( 8.2454 cumec】 विसर्ग नदीपात्रात सुरू असल्याची माहिती खडकपूर्णा नियंत्रण कक्षानी दिली आहे.धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त होऊ शकतो त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे असे आवाहन सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.

*जर सतत पाऊस सुरू राहिला तर नदीपात्रामध्ये जास्त प्रमाणात पाणी सोडण्याची गरज भासू शकते अशी माहिती खडक पूर्णा पूर नियंत्रण कक्ष यांनी दिली त्यामुळे गावातील नागरिकांनी सतर्क रहावे व तसेच प्रशासनाला सुद्धा अलर्ट राहण्याचे आदेश दिलेले आहे*.
*प्रा. संजय खडसे*
*उपविभागीय अधिकारी सिदखेड राजा*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *