देऊळगाव राजा/प्रतिनिधी : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सिंदखेड राजा जिजाऊ नगरीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनास शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवून मागण्या संदर्भात राज्य शासनाने ठोस निर्णय घेण्याचे आवाहन केले. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
शेत मालाला भाव नाही, पिक विमा मिळाला नाही, शेतकऱ्यांवर कर्जाचे ओझे वाढत चालले आहे. अशा विविध प्रश्नांवर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शासनाकडे केलेला पाठपुरावा, त्यांनी राज्य शासनाकडे शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण प्रश्नांकडे लक्ष वेधून सदर मागण्या पूर्ण होईपर्यंत जिजाऊ यांचे आजोळ असलेल्या लखोजीराव जाधव यांच्या राजवाडा समोर सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनातील मागण्यांविषयी शासनाने तात्काळ ठोस निर्णय घ्यावा असे आवाहन केले. सदर निवेदनावर प्रकाश गीते, राजेंद्र डोईफोडे,प्रदीप हिवाळे, शेख जुल्फेकार,वसंतराव पाटील,विजय घोंगे, विनायकराव भानुसे,कृष्णा डोईफोडे, सुधाकर उदार, दिगंबर भागिले,वामनराव शिंगणे,भगवान पालवे, सुमित बोराटे, गजानन मुळे, आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहे.