https://vruttamasternews.com/budha-vihar-news-651-2/
किनगाव राजा च्या भूमीत उभे राहणार शांती वन स्तूप
सोनकांबळे दाम्पत्याचा निर्धार
अँड प्रभाकर काकडे व प्रकास काकडे या
बापलेकाने दिली धम्म कार्यासाठी आपली जमीन दान
किनगाव राजा येथील नागपूर मुबई मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपा जवळ आसलेली ऍड प्रभाकर काकडे यांचे चिरंजीव प्रकास कडे यांची स्वतःची 25 गुठे जमीन बुध्द विहार बांधण्यासाठी दान देवून कुशल कर्म केले असून या 28 गुंठे जमिनीवर भव्यदििव्य ध्यान साधना केंद्र 28 फूट उंच तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती उभारणार असल्याचा संकल्प शिव विलास सोनकांबळे व वैजयंतीमाला सोनकांबळे या दाम्पत्यांनी आज बुद्ध विहाराच्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केला
किनगाव राजा ला लागूनच असलेल्या काकडे पेट्रोल पंपाजवळ ऍड प्रभाकर काकडे यांच्या मुलाच्या नावाने 25 गूठे जमीन असून सदर जमीन ही हायवे रोड ला लागूनच असल्या मुळे ही जमीन लाखो रू किमतीची आहे परंतु घरातील असलेले धम्म संस्कार आणि त्या मधून दान दानाचे महत्व ओळखून काकडे परिवाराने ही जमीन बुध्द विहार बांधण्यासाठी दान देण्याचे ठरवले अशातच वर्दडी बु येथील आणि मुंबई या ठिकाणी वास्तव्यास असलेले शिवविलास सोनकांबळे व वैजयंतीमाला सोनकांबळे या दांपत्याने 28 बुध्द विहार बांधण्याचा संकल्प केला असून त्या पैकी 5 विहार बांधून पूर्ण झाले आहे तर ही बाब जमीन दान दाते ऍड प्रभाकर काकडे यांच्या कानावर येताच सोनकांबळे दाम्पत्याचां व काकडे परिवाराचा संपर्क झाला आणि दोन्ही परिवारा मध्ये चर्चा होवून काकडे परिवाराने सोनकांबळे परिवाराला सदर लाखो रू किमतीची जमीन बुध्द विहार निर्मिती साठी दान दिली आणि लगेच सोनकांबळे परिवाराने आज दिनांक 28 जुलै रोजी भर पावसात दुपारी 1 वाजता पूज्य भंते धम्मपाल यांच्या हस्ते बौद्ध धमाच्या नियमाप्रमाने त्रिशरण पंचशील व विधी डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे पूजन करून या शांती वन स्तूपाच्या कामाचे भूमिपूजन काकडे आणि सोनकांबळे परिवाराच्या वतीने करण्यात आले या ठिकाणी भव्य दिव्य 28 फूट उंच तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती याचबरोबर भव्य स्तूप ध्यान साधना केंद्राची उभारणी करणार असल्याचा निर्धार सोनकांबळे दांपत्याने केला यावेळी पंडितराव खंदारे, आर एम गवई , दान दाते ऍड प्रभाकर काकडे, प्रकास काकडे, विजय काकडे, दान स्वीकारणारे शिवविलास सोनकांबळे, वैजयंतीमाला सोनकांबळे, बौद्धाचार्या विठल सोनकांबळे, विक्रम सोनुने, मधुकर शिंदे, लॉर्ड बुद्धा टिव्ही चे संचालक सचिन मुन, गजेंद्र गवई वर्डदी बू चे सरपंच मधुकर इंनकर , पत्रकार रामदास कहाळे यांच्या सह परिसरातील बौध्द उपासक उपासिका प्रामुख्याने हजर होत्या या भूमिपूजन समारंभाचे सूत्र संचालन मधुकर साळवे यांनी केले