https://vruttamasternews.com/buldhana-letest-news-3/
विजेचा धक्का लागून बापलेकांचा मृत्यू.
मेरा बुद्रुक गावावर शोककळा.
सुनिल अंभोरे/जिल्हा प्रतिनिधी
चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक गावातील रहिवासी असलेले रामेश्वर उत्तम पडघान वय ४६ वर्ष हे शेतामध्ये काम करत होते. काल मुरातपूर शिवारात शेतामध्ये दोघे बापलेक काम करत असताना जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे त्यांचा मुलगा वैभव उर्फ पप्पू वय अंदाजे १९ दोन वर्ष काम करत असताना त्याला जोरदार झटका लागला. मिळालेल्या माहितीनुसार त्याचे वडील त्याला विद्युत झटका लागत असताना बाजूला उभे असलेले त्यांच्या वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याला वाचविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. केलेले अनेक प्रयत्न निष्फळ ठरत असताना शेवटी त्यांच्या गळ्यातील रुमालाच्या साह्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या अंगाला विद्युत तार गुंडाळलेली असल्यामुळे तारे सगट तो बापाकडे खेचला गेला. त्यामध्ये बापालाही विद्युतचा जोरदार झटका लागला. त्यामुळे त्यांचाही त्यामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झाला. मृतक पावलेल्या इसमाला दोन मुले होती. त्यापैकी हा मृत झालेला लहान मुलगा होता तर त्याचा मोठा भाऊ इंजिनिअरिंग शिक्षण घेत आहे. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील सह, दुय्यम ठाणेदार , कर्मचारी, पंचा समक्ष यांनी धाव घेऊन घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पंचा समक्ष पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथे मृतदेह पाठवण्यात आले होते. घटनास्थळावर नागरिकांनी खूप गर्दी केली होती. शवविच्छादनानंतर रात्री साडेदहा वाजता शोकाकुल वातावरणात त्या दोघाबापलेकावर त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीसाठी मेरा बुद्रुक सह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पुढील तपास अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे. घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे मेरा बुद्रुक सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संपूर्ण मेरा बुद्रुक गावावर शोक कळा पसरलेली आहे.