https://vruttamasternews.com/buldhana-letest-news-4/
जिजाऊ जन्म स्थळ ते जिजाऊ समाधी स्थळ रथ यात्रेस प्रारंभ
सिंदखेड राजा/ प्रतिनिधी
सिंदखेड राजा येथील राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव यांच्या पुढाकाराने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी जिजाऊ जन्म स्थळ ते जिजाऊ समाधी स्थळ पाचाड किल्ले रायगड या ठिकाणी जात असलेल्या रथ यात्रे चां शुभारंभ आज 15 जून रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या 350 स्मृती दिनानिमित्त राजे लखोजीराव जाधवराव यांच्या राजवाड्यातील जिजाऊ माँ साहेबांना अभिवादन करून ही रथ यात्रा जन्मस्थळ मातृतीर्थ सिदखेडराजा ते पाचाड किल्ले रायगड यांच्या समाधीस्थळी यात्रेचे आयोजन 15 जून 2024 सकाळी 9 वाजता मान्यवरांच्या हस्ते पूजन करून यात्रेस प्रारंभ करण्यात आला हि रथयात्रा सकाळी 14 जून 2024 रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथून अहमदनगर मार्गे पाचाड ला 17 जून रोजी पोहचेल . राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जिजाऊ जन्मस्थळ ते जिजाऊ समाधी स्थळ या रथ यात्रे चां शुभारंभ आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी आमदार तोताराम कायंदे, भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ, नगराध्यक्ष सतीश तायडे , जगणं मामा सहाने,देविदास भाऊ ठाकरे , यांच्या सह परिसरातील राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या रथ यात्रेचे आयोजन लखोजीराव राजे जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव यांनी केले होते