https://vruttamasternews.com/buldhana-letest-news-5/
मूर्ती इतरत्र हलवू नये यासाठी खासदारांना निवेदन…!!
आज खामगाव येथे जळगाव खान्देशच्या खासदार स्मिता ताई वाघ, व राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांना निवेदन दिले.
मातृतीर्थ सिंदखेड राजा जिल्हा बुलडाणा येथे राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी समोर उत्खनन करत असताना शेषशाही ब्रम्ह, लक्ष्मी व माठीमागे इतर देवदेवतांची समुद्रमंथन करत असतानाची अत्यंत दुर्मीळ व उत्कृष्ठ शिल्पकलेचा नमुना असलेल्या मूर्तीचे उत्खनन सुरू आहे, ती येत्या दोन दिवसात पुर्णपणे बाहेर येणार आहे, पुरातत्त्व विभाग हि मूर्ती सिंदखेड राजा येथून उचलून नागपुरला नेणार आहे, आम्हा शहरवासीयांची विनंती आहे कि हि मुर्ती मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे वस्तूसंग्रहालयात कायमस्वरूपी ठेवण्यात यावी हि विनंती.
तसेच सिंदखेडराजा शहरांमध्ये इतरही ऐतिहासिक स्थळांच्या उत्खनन करून तेथे ऐतिहासिक वस्तूंचा शोध घेण्यात यावा तसेच राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीसमोर एक फार मोठी बारव असल्याचे जुने जाणकार लोक सांगत आहे त्या समाधी समोर जे मंदिर सापडले आहे तिथून त्या बारवेत जाण्याचा रस्ता असल्याचे जुने जाणकार सांगतात त्यामुळे त्या परिसराचे अजून उत्खनन होऊन ऐतिहासिक काही गोष्टी सापडतात का याचा शोध घेण्यास यावा या करिता आपण संबधीत विभागास आपण पत्रव्यवहार करून किंवा भेट घेऊन येथील मूर्ती मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील वस्तुसंग्रहालयात कायम ठेवण्यात यावी, व अजून उत्खनन करून काही मिळते का याचा शोध घ्यावा या विषयी त्यांना निवेदन दिले. दोन्ही खासदारांनी तात्काळ त्या विषयी पत्र तयार करण्यास सांगितले व अधिवेशनात संसदेत संबधित मंत्र्यांची भेट घेऊन सदर विषयी चर्चा करू व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते तथा सिंदखेड राजा मतदार संघ निवडणुक प्रमुख विनोद भाऊ वाघ, सिंदखेड राजा भाजप तालुकाध्यक्ष आत्माराम शेळके, सिंदखेड राजा भाजप शहराध्यक्ष ऍड संदीप मेहेत्रे यांनी निवेदन दिले.