Buldhana letest news पीक विमा वारंवार उपोषण करूनही मिळत नसल्याने जल समाधी घेण्याचा दिला इशारा

 

https://vruttamasternews.com/buldhana-letest-news-6/

मा उपविभागीय अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने.

 

सिंदखेड राजा /प्रतिनिधी

 

शासन दरबारीं शेतकऱ्यांवर पीकविमा कंपनीचीच वरचढ, वैतागलेल्या शेतकऱ्यांचा सामूहिक जलसमाधी चा निर्धार

मातृतीर्थ सिंदखेड राजा व देऊळगाव राजा येथील प्रलंबित सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मिळविण्यासाठी व शेडनेट पिक विमा व मदत मिळवण्यासाठी व इतर १७ अनेक मागण्या श्री बालाजी सोसे व श्री गजानन जायभाये यांनी मागील आठवड्यात दिलेल्या आत्मदहन आंदोलन शामविण्यासाठी प्रशासनाने 26 जून ची ठेवलेली बैठक निष्फळ ठरली आणि प्रशासनाने पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या फीडिंग पुढे हतबल होत शेतकऱ्यांची अक्षरशः चॉकलेट वर बोळवण करण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध संयुक्तिक प्रश्नावली मुळे प्रशासन हतबल झालेले दिसून आले आणि शेवटी जेव्हा वरतून येईल तेव्हाच विमा मिळेल असा सावध पवित्रा घेतला.

 

याचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी दिनांक 30 जून पर्यंत विमा प्रश्नावर निर्णय न झाल्यास सामूहिक जलसंमाधी आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आपला सर्व रोष कृषी विभाग व पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीनवर नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केला.

या प्रसंगी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शेतकऱ्यांची बाजू अत्यंत अभ्यासू व आक्रमक पणे मांडण्यासाठी बालाजी सोसे व श्री गजानन जायभाये यांच्या सोबतीला बळीवंश लोकचळवळीचे श्री नितीन कायंदे, श्री भगवान पालवे, किशोर कायंदे, श्री राजेश फुलझाडे व सिंदखेडराजा युवा संघर्ष समिती अध्यक्ष श्री. कैलास मेहेत्रे शेतकरी नेते शिवराज भाऊ कायदे उध्दव मुंढे छगन धायतडक देवानंद सोसे परमेश्वर पालवे देवानंद भानुदास काकड रामकृष्ण विष्णू डोईफोडे समाधान रमेश डोईफोडे राजेंद्र देवराव होलगरे दिलीप देवराव होलगरे विष्णू तुळशीराम होलगरे सुरेश कोल्हे किसन कोल्हे दत्तात्रय तुळशीराम होलगरेव ईतर असंख्य शेतकरी उपस्थित होते. शासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी श्री खडसे, ना तहसीलदार अस्मा मुजावर, कृषी अधिकारी श्री पांचाळ व पीकविमा कंपनी चे श्री मांटे यासमवेत विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *