सिंदखेडराजा /रामदास कहाळे राज्य शासनाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्यामार्फत शासन निर्णय काढून राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाची नावे बदलण्यास मान्यता दिली. त्यानुसार सिंदखेडराजा मतदार संघातील देऊळगाव राजा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत चोखामेळा तर सिंदखेडराजा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राजे लखुजीराव जाधव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थां असे नामकरण शासनाने केले आहे. या देऊळगाव राजा येथील संस्थेला संत चोखामेळा व सिंदखेडराजा येथील संस्थेला राजे लखोजीराव जाधव नावं देण्यात यावी अशी मागणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी केली होती
राज्य शासनाने १५ जानेवारी २०२५ रोजी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्यामार्फत शासन निर्णय काढत राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत या संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. अशा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा मुख्य उद्देश हा युवकांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवणे व खाजगी औद्योगिक आस्थापनांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळांचा पुरवठा करणे असा आहे.
राज्यात ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व ५८५ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. ८ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाने राज्यातील या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नावे बदलण्याचा विचार केला होता. याच अनुषंगाने १५ जानेवारी २०२५ रोजी शासन निर्णयाद्वारे राज्यातील १३२ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार सिंदखेडराजा मतदार संघातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत चोखामेळा यांचे जन्मस्थळ असलेल्या देऊळगाव राजा तालुक्यातील संस्थेला संत चोखामेळा तर छत्रपती शिवरायांचे आजोळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजे लखोजीराव जाधव यांना सिंदखेडराजा येथील संस्थेला नाव नाव देऊन एक प्रकारे त्यांचा सन्मानच केला असल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नाला हे मोठे यश मानले जात आहे