बुलढाणा /सचिन खंडारे सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक गावांमध्ये बैलपोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला सोमवार त्याचबरोबर श्रावण सोमवारचा शेवटचा दिवस व पोळा सुद्धा असल्यामुळे उत्साहाचं वातावरण खेड्यापाड्यांमध्ये दिसत होते अगदी सकाळपासूनच अधून मधून पाऊस पडत असल्यामुळे दिवसभर ढगाळ वातावरण होते,
शिंदी गावात सुद्धा उत्साहात पोळा साजरा झाला
अनेकांनी बैल धुण्याकरता शेतात विहिरीवर नदीवर नेले होते, त्यानंतर दुपारी चार वाजेपासून सजवलेले बैल गावच्या वेशीपासून तर सकिंद्रा माता मंदिरापर्यंत वाजत गाजत नेण्यात आले,तेथे दर्शन घेतल्यानंतर परत बैल वेशीवर आणण्यात आले,मानपाण्याच्या बैलाचे औक्षण करण्यात आले ,व नंतर पोळा फुटला असे जाहीर करण्यात आले,अतिशय शांततेत पोळा सण साजरा झाला कुठलेही पोलीस संरक्षण गावामध्ये नव्हते तरी सुद्धा गावकऱ्यांनी शांततेत पोळा सण साजरा केला,
त्याचबरोबर सिंदखेडराजा तालुक्यामध्ये ठीक ठिकाणी पोळा सन काही ठिकाणी अपवाद वगळता शांततेत साजरा झाला तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू विक्री झाली काही गावात तर पाच बॉक्स ( दारूची खोके सुद्धा पुरले नसल्याचे गोपनीय माहिती आहे )
त्यामुळे पोळा जरी शांततेत झाला तरी दारूचा महापूर मात्र पोळ्याच्या दिवशी वाहत होता .