बुलढाणा /सचिन खंडारे कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव बैलपोळा,बैलपोळा वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये दि 2 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला.यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी बैलांची पूजन व स्वागत केले.
कष्टाशिवाय मातीला बैलाशिवाय शेतीला अन् बळीराजाशिवाय देशाच्या प्रगतीला पर्याय नाही. शेतकरी राजा पोळ्याच्या सणा निमित्त शेतात वर्षभर काबाडकष्ट कष्ट करणाऱ्या ( गुण्या -गोविंदया ) आवडत्या बैलांना गरम पाण्याने अंघोळ घालून , बाशिंग झुलांनी सजवून , त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढून , प्रेमाने पुजा – अर्चा करून , त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करीत असतात. उपविभागीय अधिकारी कार्यालय मध्ये प्रा. संजय खडसे यांनी सुद्धा बैल पोळ्याचे पूजन केले . यावेळी सिदखेडराजाचे तहसीलदार धानोरकर यांनी सुद्धा येथील बैलाचे पुजन व स्वागत केले. व तसेच उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या..