सिंदखेड राजा/ वृत्त मास्टर न्यूज नेटवर्क शेतकरी नेते रविकांत तुपकर मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर आत्महत्येचे प्रात्यक्षिक दाखवण्याकरता हजारो शेतकरी घेऊन गेले होते परंतु सदर आंदोलन प्रशासनाने उधळून लावले,त्यानंतर परत एकदा रविकांत तुपकर मैदानात उतरले असून सरकारने सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा त्याचबरोबर सरसकट कर्जमाफीसाठी व इतर मागण्यासाठी राष्ट्रमाता मॉ जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर चार सप्टेंबर पासून सकाळी दहा वाजेपासून रविकांत तुपकर हे अन्नत्याग आंदोलन करणार आहेत, त्यामुळे सिंदखेडराजा मतदार संघामध्ये आंदोलन असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत करम सिनखेडराजा मतदारसंघातूनच रविकांत तुपकर यांना ३०, ००० मतांचा लीड मिळाला होता लोकसभेचे गणित वेगळे परंतु विधानसभेचे हे वेगळे असतात मात्र सिनखेडराजा मतदारसंघांमध्ये रविकांत तुपकर यांची ताकद मतदानातून आजही कायम आहे,अण्णा त्यात आंदोलनामुळे पुन्हा एकदा सिंदखेडराजा मतदारसंघ ढवळून निघणार असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वातावरण गरमागरम होणार हे मात्र नक्की,31 ऑगस्ट च्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा देणार असे कृषिमंत्री यांनी जाहीर केले होते बुलढाणा जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांनी सुद्धा कृषिमंत्री यांची भेट घेतली होती परंतु एक तारीख उलटून गेली तरीही शेतकऱ्यांच्या खातात एक रुपया सुद्धा जमा झाला नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे .
2 सप्टेंबर रोजी पोळा सण झाल्यामुळे त्याचबरोबर 4 सप्टेंबरला रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बैलाच्या पाठीवर अन्नत्याग आंदोलनाच्या झुला व बॅनर लावलेले असल्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले आहे,